नववर्षात ग्राहकांना झटका, सोन्याची पुन्हा मोठी भरारी; बघा आजचे लेटेस्ट दर

Gold-Silver Rate Today 3 January 2025

Gold-Silver Rate Today | गेल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये मौल्यवान धातू सोन्याच्या किमतीमध्ये मोठे बदल झाले. मागच्या वर्षात आतापर्यंतचे दरवाढीचे सर्व रेकॉर्ड तोडले गेले. आता या नवीन वर्षात देखील सोन्याने भरारी घेतली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारीला सोन्यात साधारण 500 रुपयांची वाढ दिसून आली होती. त्यानंतर आज 3 जानेवारीरोजी देखील सकाळच्या सत्रात दरवाढीचे संकेत मिळत आहेत. (Gold-Silver Rate Today )

डिसेंबरच्या अखेरच्या टप्प्यात सोने 650 रुपयांनी महागले. या आठवड्याच्या सुरुवातीला 30 डिसेंबर रोजी सोने 160 रुपयांनी वधारले. तर, आज 3 जानेवारी देखील सोन्याच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,480 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

तर, गेल्या आठवड्यात चांदी 1,100 हजार रुपयांनी महागली होती. 30 डिसेंबर रोजी किंमतीत बदल दिसला नाही. 31 डिसेंबर रोजी चांदी 1900 रुपयांनी स्वस्त झाली. यानंतर 1 आणि 2 जानेवारी 2025 रोजी किंमतीत बदल दिसला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 90,500 रुपये किलो आहे.

14 ते 24 कॅरेटच दर काय आहेत?

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 77,079, 23 कॅरेट 76,770, 22 कॅरेट सोने 70,604 रुपयांवर आहे. तर 18 कॅरेट आता 57,809 रुपये, 14 कॅरेट सोने 45,091 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.

दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. (Gold-Silver Rate Today )

सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते. (Gold-Silver Rate Today)

News Title – Gold-Silver Rate Today 3 January 2025

महत्त्वाच्या बातम्या-

लाडक्या बहीणींना सरकारचा धक्का, ‘ही’ एक चूक अन् तुमचा अर्ज होणार बाद

नवीनवर्षात इंधनदरात मोठा दिलासा, पेट्रोल-डिझेल ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त?

नववर्षातील आज पहिली विनायक चतुर्थी, बाप्पा ‘या’ राशींची करणार इच्छापूर्ती!

धनंजय मुंडे राजीनामा देणार?, स्वतः माहिती देत केला मोठा खुलासा

वाल्मिक कराडचा एन्काउंटर होणार???, आताच्या घडीची मोठी माहिती समोर!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .