Gold-Silver Rate Today | एप्रिल आणि मे या महिन्यात सोन्याच्या किंमतीने अनेक रेकॉर्ड तोडले. पहिल्यांदाच सोनं 75 हजारांच्याही पुढे गेल्याचं दिसून आलं. त्यामुळे या महिन्यात ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसली.
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मात्र, दरवाढीला ब्रेक लागला.गेल्या आठवड्यात सोने घसरणीवर होते. सोन्याची किंमत 2700 रुपयांनी उतरली होती. आता महिन्याच्या शेवटच्या दिवशी त्यात 440 रुपयांची घसरण आली. 27 मे रोजी 270, 28 मे रोजी 220 तर 29 मे रोजी 270 रुपयांनी सोने वाढले होते. आज मात्र, त्यात घसरण झाली आहे.
सोन्याचा मोठा दिलासा
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आता 22 कॅरेट सोने 66,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,910 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. पाहायला गेलं तर, सोनं अजूनही 70 हजारांच्या पुढेच आहे.
चांदीचा काही अंशी दिलासा
27 मे रोजी चांदीत 1500 रुपयांची (Gold-Silver Rate Today ) वाढ झाली. 28 मे रोजी चांदीने 3500 रुपयांची मोठी झेप घेतली. तर 29 मे रोजी त्यात पुन्हा 1200 रुपयांची भर पडली. मात्र, 30 मे रोजी चांदीत तितकीच घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 96,500 रुपये आहे.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, सध्या 24 कॅरेट सोने 72,115 रुपये, 23 कॅरेट 71,826 रुपये, 22 कॅरेट सोने 66,057 रुपये झाले. 18 कॅरेट 54,086 रुपये, 14 कॅरेट सोने 42,187 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले आहे.
घरबसल्या जाणून घ्या भाव
दरम्यान, ग्राहक सोने आणि चांदीच्या किंमती (Gold-Silver Rate Today ) घरबसल्या पण जाणून घेऊ शकतात. स्थानिक कर, इतर करांमुळे प्रत्येक शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते.ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.
News Title : Gold-Silver Rate Today 31 May 2024
महत्त्वाच्या बातम्या-
घराबाहेर पडण्यापुर्वी विचार करा! ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट
निकालाआधीच पिंपरी चिंचवडमध्ये झळकले उदयनराजेंच्या विजयाचे बॅनर!
पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यावर अजितदादांच्या ‘या’ आमदाराचा प्रभाव; प्रांताधिकाऱ्याने केला गंभीर आरोप
पुणेकरांनो सावधान! शहरातील ‘या’ ठिकाणच्या वाहतुकीत बदल, असा असणार पर्यायी मार्ग
इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा फॉर्मुला ठरला!… तर यांची वर्णी लागणार