Gold-Silver Rate Today | आज 4 ऑगस्टरोजी आठवड्याच्या शेवटी सोन्याने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. आज सोनं स्वस्त झालं आहे. त्यामुळे ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. या आठवड्यात सोन्याने दोन हजारांची भरारी घेतली तर चांदीत 3200 रुपयांची दरवाढ झाली. आठवड्याच्या अखेरीस मात्र मौल्यवान (Gold-Silver Rate Today) धातूमध्ये घसरण झाली.
या आठवड्यात सोन्यामध्ये 1900 रुपयांची वाढ झाली. 29 जुलैला सोने 270 रुपयांनी महागले. मंगळवारी किंमती 210 रुपयांनी उतरल्या. 31 जुलै रोजी सोने 870 रुपयांनी महागले. 1 ऑगस्ट रोजी त्यात 540 रुपयांची वाढ झाली. 2 ऑगस्टला परत 330 रुपयांनी किंमती वाढल्या.
आजच्या सोने-चांदीच्या किंमती
तर, काल 3 ऑगस्टला सोने 110 रुपयांनी कमी झाले. आज सकाळी देखील घरसणीचे संकेत दिसले. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आता 22 कॅरेट सोने 64,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 70,730 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
या आठवड्यात चांदीने देखील तूफान फटकेबाजी केली (Gold-Silver Rate Today )आहे. 31 जुलै रोजी चांदीने 2 हजारांची भरारी घेतली. 1 ऑगस्ट रोजी चांदीत 600 रुपयांची दरवाढ झाली. तर 3 ऑगस्ट रोजी किंमत 1700 रुपयांनी उतरली.गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 85,500 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव जाणून घ्या-
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 70,392, 23 कॅरेट 70,110, 22 कॅरेट सोने 64,479 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 52,794रुपये, 14 कॅरेट सोने 41,179 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.
घरबसल्या जाणून घ्या भाव-
दरम्यान, तुम्ही सोने आणि (Gold-Silver Rate Today) चांदीच्या किंमती घरबसल्या पण जाणून घेऊ शकता. स्थानिक कर, इतर करांमुळे प्रत्येक शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते.ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.
News Title : Gold-Silver Rate Today 4 August 2024
महत्त्वाच्या बातम्या-
सतर्क! राज्यात आज अतिवृष्टीचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी
“कंगना राणौतचा चेहरा पाहिला तर पाप..”; शंकराचार्य यांचं वक्तव्य चर्चेत
आज ‘या’ राशी होतील धनवान; गुंतवणुकीतून मिळेल बक्कळ पैसा
“खड्ड्यांचं पुणं झालंय, त्यांना खड्डापुरुष पुरस्कार द्या”; उद्धव ठाकरे गडकरींवर बरसले
“अमित शाह म्हणजे अहमद शाह अब्दालीचा राजकीय वंशज”