Gold-Silver Rate Today | या आठवड्यामध्ये सोन्याच्या दरात चढउताराचे सत्र दिसून आले. आज 4 जुलैरोजी मात्र, ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. दोन दिवसात सोन्याने दरवाढीत आघाडी घेतल्यानंतर कालपासून विश्रांती घेतली आहे. आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. तर, चांदीचे भाव मात्र सुसाट आहेत. गेल्या तीन दिवसांत चांदी 1500 रुपयांहून वधारली.
मागच्या आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ झाली होती. 2 जुलै रोजी सोने 110 रुपयांनी वधारले होते. तर 3 जून रोजी भावात कोणताच बदल दिसला नाही. तर, आज 4 जुलैरोजी सकाळी घसरणीचे संकेत दिसत आहेत.
सोने-चांदीचे आजचे दर
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA),आता 22 कॅरेट सोने 66,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,530 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. बघायला गेलं तर, सोनं अजूनही 70 हजारांच्या पुढेच आहे.
दुसरीकडे चांदीचे भाव देखील वाढतच चालल्याचं (Gold-Silver Rate Today ) चित्र आहे. 1 जुलै रोजी चांदी 200 तर 2 जुलै रोजी 800 रुपयांनी आणि 3 जुलै रोजी चांदी 500 रुपयांनी वधारली. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 91,500 रुपये आहे.
कॅरेटचा भाव काय?
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 24 कॅरेट सोने 72,226 रुपये, 23 कॅरेट 71,937 रुपये, 22 कॅरेट सोने 66,159 रुपये झाले. 18 कॅरेट 54,170 रुपये, 14 कॅरेट सोने 42,252 रुपये प्रति 10 ग्रॅमवर (Gold-Silver Rate Today ) पोहचले आहेत.
घरबसल्या जाणून घ्या भाव
दरम्यान, तुम्ही सोने आणि (Gold-Silver Rate Today) चांदीच्या किंमती घरबसल्या पण जाणून घेऊ शकता. स्थानिक कर, इतर करांमुळे प्रत्येक शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.
News Title : Gold-Silver Rate Today 4 July 2024
महत्त्वाच्या बातम्या-
आज ‘या’ 4 राशींच्या संपत्तीत होणार प्रचंड वाढ!
“मुस्लिम समाजाच्या ‘या’ महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका”; मनसे आक्रमक
वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्माची अजून एक मोठी घोषणा!
“अजित पवार माझे मित्र, हे सरकार पुन्हा यावं, मी मंत्री व्हावं”; पांडुरंगाला कुणी घातलं साकडं?
राज्य सरकारचा मोठा निर्णय! आषाढी वारीला जाणाऱ्या वाहनांना आजपासून टोलमाफी