Gold-Silver Rate Today | लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल आज मंगळवारी 4 जूनरोजी लागत आहे. आजच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. जनतेचा कौल कुणाला हे अवघ्या काही तासात समोर येईल. अशात व्यापारी जगतातून एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे.
या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने स्वस्त झाले. तर चांदीनेही मोठा दिलासा दिला आहे. आज सोन्याने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. 1 जून रोजी सोने 210 रुपयांनी स्वस्त झाले. तर 3 मे रोजी किंमती 440 रुपयांनी उतरल्या.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आता 22 कॅरेट सोने 66,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,260 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. पाहायला गेलं तर, सोनं अजूनही 70 हजारांच्या पुढेच आहे.
चांदीचा मोठा दिलासा
गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीने 6 हजारांची भरारी घेतली होती. त्यानंतर त्यात मोठी घसरण झाली. 1 जून रोजी 2,000 रुपये तर 3 जून रोजी 700 रुपयांनी चांदी घसरली होती. आज (Gold-Silver Rate Today) एक किलो चांदीचा भाव 92,800 रुपये आहे.
घरबसल्या जाणून घ्या भाव
दरम्यान, तुम्ही सोने आणि (Gold-Silver Rate Today)चांदीच्या किंमती घरबसल्या पण जाणून घेऊ शकता. स्थानिक कर, इतर करांमुळे प्रत्येक शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते.ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.
News Title : Gold-Silver Rate Today 4 june 2024
महत्त्वाच्या बातम्या-
आज शंभर टक्के या राशी गुलाल उधळणार; पाहा कोणाचं नशीब उजळणार
मोठी बातमी! भाजपनं स्वबळावर केला 200 चा आकडा पार
शिरूरमध्ये अजितदादांना धक्का; अमोल कोल्हे यांनी आढळरावांना टाकलं मागे
भाजपला धक्का बसण्याची शक्यता; प्रणिती शिंदे आघाडीवर
हिमाचलमध्ये कंगना रनौतला धक्का; कॉँग्रेसचे विक्रमादित्य सिंह आघाडीवर