वर्षाच्या शेवटच्या महिन्यात काय आहेत सोने-चांदीचे दर?, जाणून घ्या एका क्लिकवर

Gold-Silver Rate Today | सध्या डिसेंबर महिना सुरू आहे. 2024 हे वर्ष संपण्यासाठी आता खूपच थोडे दिवस शिल्लक आहेत. या संपूर्ण वर्षांत मौल्यवान धातू सोन्याने ग्राहकांचा खिसा चांगलाच खाली केलाय. या वर्षात सोन्याने दरवाढीचे अनेक रेकॉर्ड केले आणि तोडले देखील. वर्षाच्या या शेवटच्या महिन्यात देखील सोने आणि चांदीमध्ये चढ-उतारचे सत्र दिसून येत आहे. (Gold-Silver Rate Today)

या आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातुत पडझड झाली. त्यानंतर त्यात उसळी आली. चांदीला 30 नोव्हेंबरपासून आघडी घेता आलेली नाही. सोमवार आणि मंगळवार सोन्याने उसळी घेतली होती. तर, काल गुरुवारी 5 डिसेंबररोजी देखील भाव वरचढ दिसले. आज सकाळच्या सत्रातही सोन्यात दरवाढीचे संकेत मिळत आहेत.

गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,004 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर मागील आठवड्यात चांदीत जितकी उसळी आली. तितकीच घसरण झाली. सोमवारी चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली. त्यानंतरच्या दोन दिवसांत चांदीला आघाडी घेता आली नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 92,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव जाणून घ्या-

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,453, 23 कॅरेट 76,147, 22 कॅरेट सोने 70,031 रुपयांवर आहे. तर 18 कॅरेट आता 57,340 रुपये, 14 कॅरेट सोने 44,725 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.

दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. (Gold-Silver Rate Today )

सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते. (Gold-Silver Rate Today)

News Title – Gold-Silver Rate Today 6 December 2024

महत्त्वाच्या बातम्या-

एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पवना धरणात घडली दुःखद घटना

पिंपरी-चिंचवडमधील तब्बल ‘एवढ्या’ लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या!

ऐन हिवाळ्यात महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट, ‘या’ जिल्ह्यांत धो-धो बरसणार!

हिवाळ्यात हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? अशाप्रकारे काळजी घ्या

वर्षाच्या शेवटी RBI चा सर्वसामान्यांना सर्वात मोठा धक्का!