Gold-Silver Rate Today | जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात चढ-उताराचे सत्र दिसून आले. चांदीने या आठवड्यामध्ये मोठी झेप घेतली. तर, सोन्याने काही अंशी दिलासा दिला आहे. आज 6 जुलैरोजी आठवड्याच्या शेवटी चांदीचे दर वाढले आहेत. तर, सोन्याचे भाव घसरले आहेत.
आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच 2 जुलैरोजी 110 रुपयांनी सोने वधारले. दुसऱ्या दिवशी भावात बदल झाला नाही. 4 जुलै रोजी सोन्याने 710 रुपयांची मुसंडी घेतली. तर शुक्रवारी भावात मोठा बदल दिसला नाही. आज सकाळी (Gold-Silver Rate Today ) सोन्यात घसरणीचे संकेत आहेत.
आजचे सोने-चांदीचे भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA),आता22 कॅरेट सोने 67,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोनं अजूनही 70 हजारांच्या पुढेच आहे.
दुसरीकडे चांदीचे भाव वाढतच चालल्याचं (Gold-Silver Rate Today ) चित्र आहे. 1 जुलै रोजी चांदी 200 तर 2 जुलै रोजी 800 रुपयांनी आणि 3 जुलै रोजी चांदी 500 रुपयांनी वधारली. तर 4 जुलै रोजी चांदीने 1500 रुपयांची भर घेतली. 5 जुलै रोजी त्यात पुन्हा 200 रुपयांची भर पडली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 93,200 रुपये आहे.
कॅरेटचा भाव काय?
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 72,640 रुपये, 23 कॅरेट 72,349 रुपये, 22 कॅरेट सोने 66,538 रुपये झाले. 18 कॅरेट 54,480 रुपये, 14 कॅरेट सोने 42,494 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले आहे.
घरबसल्या जाणून घ्या भाव
दरम्यान, तुम्ही सोने आणि (Gold-Silver Rate Today) चांदीच्या किंमती घरबसल्या पण जाणून घेऊ शकता. स्थानिक कर, इतर करांमुळे प्रत्येक शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.
News Title : Gold-Silver Rate Today 6 July 2024
महत्त्वाच्या बातम्या-
अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात अमृता फडणवीस अन् लेक दिविजाच्या लुकने वेधलं लक्ष; पाहा Video
“आता फक्त दाऊदला क्लीनचीट देणं बाकी”; वायकरांवरील गुन्हे मागे घेताच संजय राऊतांचा हल्लाबोल
मुंबईकरांनो ‘या’ कारणामुळे मुंबईतील ‘हे’ रस्ते 4 दिवस बंद राहणार; असा असणार पर्यायी मार्ग
मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीला आजपासून सुरवात; असा असणार रॅलीचा मार्ग
पुण्यात रात्री घडला धक्कादायक प्रकार; महिला पोलिसावर पेट्रोल ओतलं..पुढं काय घडलं