Gold-Silver Rate Today | लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल मंगळवारी 4 जूनरोजी जाहीर झाला.निकालाच्या दिवशी शेअर मार्केट प्रचंड कोसळलं होतं. या निकालाचा व्यापारी जगतावर देखील परिणाम झाला आहे. निकाल लागण्यापूर्वी आणि लागल्यानंतर सोने-चांदीच्या दरात मोठी तफावत आढळून आली.
30 मेपासून मौल्यवान धातूच्या दरवाढीला ब्रेक लागला होता. पण, 4 जूनरोजी सोन्याचे भाव पुन्हा वाढले. 760 रुपयांनी सोन्यात दरवाढ झाली. 3 जून रोजी सोने 440 रुपयांची स्वस्त झाले होते. तर, 4 तारखेला त्यात पुन्हा वाढ झाली. 5 जून रोजी सोने 220 रुपयांनी स्वस्त झाले.आज पुन्हा किमती बदलल्या आहेत.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आता 22 कॅरेट सोने 66,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी झाली स्वस्त
गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीने 6 हजारांची (Gold-Silver Rate Today) भरारी घेतली होती. त्यानंतर त्यात मोठी घसरण झाली. 1 जून रोजी 2,000 रुपये तर 3 जून रोजी 700 रुपयांनी चांदी घसरली होती. 4 जून रोजी त्यात 1200 रुपयांची वाढ झाली. तर,5 जून रोजी किंमतीत 2300 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,700 रुपये आहे.
जाणून घ्या कॅरेटचा भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स (Gold-Silver Rate Today)असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 71,986 रुपये, 23 कॅरेट 71,698 रुपये, 22 कॅरेट सोने 65,939 रुपये झाले. 18 कॅरेट 53,990 रुपये, 14 कॅरेट सोने 42,112 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले आहे.
घरबसल्या जाणून घ्या भाव
दरम्यान, तुम्ही सोने आणि (Gold-Silver Rate Today)चांदीच्या किंमती घरबसल्या पण जाणून घेऊ शकता. स्थानिक कर, इतर करांमुळे प्रत्येक शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते.ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.
News Title : Gold-Silver Rate Today 6 june 2024
महत्त्वाच्या बातम्या-
“कॉँग्रेस संपवणारे संपले, पण कॉँग्रेस नाही”; रितेश देशमुखने शेअर केला विलासरावांचा ‘तो’ व्हिडिओ
पदातून मुक्तता करण्याची मागणी करणाऱ्या फडणवीसांना अमित शहांचा फोन!
‘लोकसभेतील यशामागे तुमचं अफाट कष्ट अन्..’; उद्धव ठाकरेंनी फोन करत मानले किरण मानेंचे आभार
राज्यातील सर्वात श्रीमंत, गरीब, तरुण व वयोवृद्ध खासदार कोण; जाणून घ्या एका क्लिकवर
नवरा भाजपकडून, घटस्फोटित बायको तृणमूलकडून उभी, पाहा कुणाचा झाला विजय