Gold-Silver Rate Today | सोने आणि चांदीने आज (6 मार्च) ग्राहकांना मोठा झटका दिला आहे.मार्चमध्ये मौल्यवान धातूच्या किंमती वाढण्याचा अंदाज होता. तो खरा ठरला आहे. सोने-चांदीच्या भावात (Gold-Silver Rate Today) वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सराफा बाजारातील ग्राहकांची गर्दी आता कमी-कमी होत आहे.
ग्राहकांच्या खिशाला या महिन्यात चांगलीच झळ बसली आहे. या महिन्यात 1 मार्चपासून ते 5 मार्चपर्यंत सोन्यात 2000 रुपयांची वाढ झाली आहे. 1 मार्च रोजी 310 तर 2 मार्च रोजी 850 रुपयांनी किंमती वाढल्या. यानंतर किमती स्थिर होत्या. मात्र, कालच म्हणजेच 5 मार्च रोजी किंमतीत 700 रुपयांची वाढ झाली. तर, आजच्या किमती खाली दिल्या आहेत.
आजचे सोने-चांदीचे दर
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आजच्या (Gold-Silver Rate Today) सोने-चांदीच्या कॅरेटनुसार किंमती ठरल्या आहेत. त्यानुसार आता 22 कॅरेट सोने 59,600 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
चांदीनेही घेतली उसळी
चांदीच्या भावातही तेजी आली आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 मार्च रोजी चांदी 300 रुपयांनी महागली. 2 मार्च रोजी 500 रुपयांची वाढ झाली. 3 मार्चला 1400 रुपयांनी भाव उतरले. तर 5 मार्च रोजी चांदी पुन्हा 1100 रुपयांनी वधारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 74,700 रुपये झाला आहे.
‘असा’ असेल कॅरेटचा भाव
24 कॅरेट सोने 64,598 रुपये, 23 कॅरेट 64,339 रुपये, 22 कॅरेट सोने 59,172 रुपये झाले.18 कॅरेट 48,449 रुपये, 14 कॅरेट सोने 37,790 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले आहे. तर, एक किलो चांदीचा (Gold-Silver Rate Today) भाव 72,244 रुपये झाला आहे.
वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर आणि शुल्क लागू केले जात नाही.तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
News Title- Gold-Silver Rate Today 6 March
महत्वाच्या बातम्या-
850 विकेट घेणारा भारतीय क्रिकेटपटू निवृत्त; तरूणाईला संधी मिळावी म्हणून निर्णय
महायुतीचा राज्यातील जागावाटपाचा तिढा सुटला? अमित शाह यांची मुंबईत बैठक!
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा ईमेल हॅक, राज्यपालांना मेल गेल्याने खळबळ
महाविकास आघाडीत जागा वाटपावरून घमासान, नेत्यानं सांगितली अंदर की बात
घटस्फोटानंतर सानिया मिर्झा जगतेय ‘असं’ आयुष्य, पाहा फोटो