Gold-Silver Rate Today | मौल्यवान धातू सोने-चांदीच्या दरात सध्या चढ-उताराचे सत्र दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे आज 6 नोव्हेंबररोजी सराफा बाजारात सोन्यात नरमाई दिसू लागली आहे. चांदीचे भावही खाली आल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवाळीमध्ये दोन्ही धातू तेजीत होते. तरीही ग्राहकांनी सणा-सुदीत सोनं खरेदी केलं. आता दिवाळी सरताच सोनं खाली आलं आहे. (Gold-Silver Rate Today)
आज 6 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोने प्रतितोळा 80,350 रुपयांवर पोहोचले आहे. तर, चांदी थेट 900 रुपयांनी घसरली आहे. त्यामुळे सध्या चांदीचे दर 93,739 रुपये प्रति किलोग्रॅम आहेत. आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात 100 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोने 73,650 रुपयांवर पोहोचले आहे.
तर 17 कॅरेट सोने 80 रुपयांनी वाढलं असून ते 60,260 रुपयांवर पोहोचले आहे. आज सराफा बाजारात ग्राहकांना एक ग्रॅमसाठी 8.035 रुपये मोजावे लागतील.
कॅरेटनुसार जाणून घ्या आजचे भाव-
10 ग्रॅम सोने- 22 कॅरेटसाठीचे दर 73,650 रुपये
10 ग्रॅम सोने- 24 कॅरेटसाठीचे दर 80,350 रुपये
10 ग्रॅम सोने- 18 कॅरेटसाठीचे दर 60,260 रुपये
1 ग्रॅम सोने- 22 कॅरेटसाठीचे दर 7,365 रुपये
1 ग्रॅम सोने- 24 कॅरेटसाठीचे दर 8, 035 रुपये
1 ग्रॅम सोने- 18 कॅरेटसाठीचे दर 6, 026 रुपये
8 ग्रॅम सोने- 22 कॅरेटसाठीचे दर 58,920 रुपये
8 ग्रॅम सोने- 24 कॅरेटसाठीचे दर 64,280 रुपये
8 ग्रॅम सोने- 18 कॅरेटसाठीचे दर 48,208 रुपये (Gold-Silver Rate Today)
सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते. (Gold-Silver Rate Today)
News Title – Gold-Silver Rate Today 6 November 2024
महत्त्वाच्या बातम्या-
राज्यात विधानसभेला मेहुणे-मेव्हण्यात होणार टशन!
चंद्रकांत पाटलांच्या पुढाकारातून गदिमांच्या स्मारकाचं 70 टक्के काम पूर्ण!
“देवेंद्रजी तुमचे पूर्वज मुघलांची चाकरी करायचे, ही फडणवीसी राज्यात दाखवू नका”
राज्यातील ‘या’ भागात बरसणार पाऊस; IMD चा इशारा
राहुल गांधी करणार 5 गेमचेंजर घोषणा, मविआच्या गॅरंटीत कोणते मुद्दे?