Gold-Silver Rate Today | जागतीक पातळीवर सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. अमेरिकामधील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारली. याचा परिणाम हा जगभरातील शेअर मार्केटवर दिसून आला. सराफा मार्केटवरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे. सोन्याने पुन्हा जोरदार आघाडी घेतली आहे. तर, चांदीमध्ये मात्र सध्या घसरणीचे सत्र दिसून येत आहे. (Gold-Silver Rate Today)
मागच्या आठवड्यात सोने 2,000 रुपयांनी महागले होते. नंतर त्यात 770 रुपयांची घसरण झाली होती. या मंगळवारी सोने 150 रुपयांनी उतरले होते. तर काल 6 नोव्हेंबररोजी किंमत 150 रुपयांनी वाढली. आज सकाळच्या सत्रात सोन्यात दरवाढीचे संकेत मिळत आहेत.
गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 73,800 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 80,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीमध्ये सध्या घसरण दिसून येत आहे. या आठवड्यात चांदीत मोठा बदल दिसला नाही. तर 5 नोव्हेंबर रोजी चांदी 1 हजार रुपयांनी घसरली होती. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 96,000 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव-
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 78,136, 23 कॅरेट 77,823, 22 कॅरेट सोने 71,573 रुपयांवर घसरले. तर 18 कॅरेट आता 58,602 रुपये, 14 कॅरेट सोने 45,710 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.
दरम्यान, वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. (Gold-Silver Rate Today)
सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते. (Gold-Silver Rate Today)
News Title – Gold-Silver Rate Today 7 November 2024
महत्त्वाच्या बातम्या-
‘…नाहीतर बुक्कीत टेंगूळ निघेल’; रूपाली ठोंबरेंचा सदाभाऊ खोतांना इशारा
आज देवी लक्ष्मीच्या कृपेने कोणत्या राशी होणार धनवान?, वाचा गुरुवारचे राशीभविष्य
निलंग्यात संभाजी पाटील निलंगेकरांचा काँग्रेसला झटका!
अजित पवारांना पक्ष चिन्हावरून मोठा झटका!
नणंद बाईकडे कडक नोटा आहेत; नवनीत राणांचा कोणावर हल्ला?