सरकार स्थापनेपूर्वीच सराफा बाजारात तेजी; सोनं महागलं, आता किंमती काय?

Gold-Silver Rate Today | देशात एनडीए सरकार स्थापन होण्यासाठी दिल्लीत आता लगबग सुरू आहे. केंद्रात NDA चे तिसऱ्यांदा सरकार येत आहे. लवकरच नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. मात्र, त्यापूर्वीच सराफा बाजाराने मोठी उसळी घेतली आहे.

गेल्या दोन दिवसांत मौल्यवान धातूंनी मोठी झेप घेतली आहे. या आठवड्यात सोने 1700 रुपयांनी वाढले. 4 जूनला सोन्याने 700 रुपयांची भरारी घेतली. तर 5 जूनला 220 रुपयांनी भाव उतरले. 6 जून रोजी सोने 700 रुपयांनी वधारले. 7 जून रोजी किंमतीत 300 रुपयांची वाढ झाली.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आता 22 कॅरेट सोने 67,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीचे दर गगनाला

या दोन दिवसांत चांदीने देखील  (Gold-Silver Rate Today) उसळी घेतली आहे. 5 जूनरोजी चांदीमध्ये 2300 रुपयांची घसरण झाली. 6 जून रोजी 1800 रुपयांनी तर 7 जूनला 2500 रुपयांनी भाव पुन्हा वाढले. या आठवड्यात चांदीने 5500 रुपयांची उसळी घेतली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 96,000 रुपये आहे.

जाणून घ्या कॅरेटचा भाव

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स (Gold-Silver Rate Today)असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 71,913 रुपये, 23 कॅरेट 71,625 रुपये, 22 कॅरेट सोने 65,872 रुपये झाले. 18 कॅरेट 53,935 रुपये, 14 कॅरेट सोने 42,069 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले आहे.

घरबसल्या जाणून घ्या भाव

दरम्यान, तुम्ही सोने आणि (Gold-Silver Rate Today)चांदीच्या किंमती घरबसल्या पण जाणून घेऊ शकता. स्थानिक कर, इतर करांमुळे प्रत्येक शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते.ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

News Title : Gold-Silver Rate Today 8 june 2024

महत्त्वाच्या बातम्या-

“सुजल्यावरच कळतंय..”; शरद पवार गटाने बॅनरद्वारे अजित पवारांना डिवचलं

सरकारी बँकेने ग्राहकांना दिला झटका! व्याज दरात केली ‘तब्ब्ल’ एवढ्या टक्क्यांची वाढ

ठाकरे गटात पुन्हा राजकीय भूकंप?, शिंदे गटाच्या दाव्याने खळबळ

भारत-पाकिस्तान सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या A टू Z माहिती

नगरमध्ये मोठा राडा; निलेश लंकेंचे समर्थक राहुल झावरेकडून गर्भवती महिलेवर हल्ला; भाजपचा गंभीर आरोप