महिला दिनी सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे ताजे दर

Gold-Silver Rate Today 8 March 2025 

Gold-Silver Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढउतार होत असून, गेल्या आठवड्यात सोने 1200 रुपयांनी स्वस्त झाले होते. मात्र, सोमवारी आणि मंगळवारी सोन्याने 1360 रुपयांची झेप घेतली. त्यानंतर सलग दोन दिवसांपासून किंमतीत घसरण झाली आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरात सतत वाढ होत असून, गेल्या आठवड्यात 5 हजार रुपयांनी स्वस्त झालेली चांदी आता पुन्हा महाग झाली आहे. (Gold-Silver Rate Today)

आजचे सोन्याचे दर

गुडरिटर्न्सनुसार, 8 मार्च 2025 रोजी सोन्याचे दर पुढीलप्रमाणे आहेत:

  • 22 कॅरेट सोने: 80,050 रुपये प्रति 10 ग्रॅम
  • 24 कॅरेट सोने: 87,310 रुपये प्रति 10 ग्रॅम

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA):

  • 24 कॅरेट: 86,059 रुपये प्रति 10 ग्रॅम
  • 23 कॅरेट: 85 ,714 रुपये प्रति 10 ग्रॅम
  • 22 कॅरेट: 78,830 रुपये प्रति 10 ग्रॅम
  • 18 कॅरेट: 64,544 रुपये प्रति 10 ग्रॅम
  • 14 कॅरेट: 50,345 रुपये प्रति 10 ग्रॅम

चांदीच्या दरात वाढ

गेल्या आठवड्यात चांदी 5 हजार रुपयांनी स्वस्त झाली होती. मात्र, या आठवड्यात 2100 रुपयांची वाढ झाली आहे.

  • 8 मार्च 2025 रोजी एक किलो चांदीचा दर: 99,100 रुपये
  • IBJA नुसार चांदीचा दर: 96 ,724 रुपये प्रति किलो

घरबसल्या जाणून घ्या सोन्या-चांदीचे दर

सोन्या-चांदीच्या दरांमध्ये स्थानिक कर आणि इतर शुल्कांमुळे प्रत्येक शहरात किंमती वेगळ्या असतात. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) दररोज नवे दर जाहीर करते. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन ताजे दर मिळवू शकता. (Gold-Silver Rate Today)

Title : Gold-Silver Rate Today 8 March 2025 

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .