Gold-Silver Rate Today | मौल्यवान धातू सोन्याच्या दरात सध्या चढ-उताराचे सत्र दिसून येत आहे. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होताच जागतिक व्यापार आणि उद्योगावर परिणाम दिसून आला. सराफा बाजारावर देखील त्याचे परिणाम उमटले. सध्या सोने आणि चांदीमध्ये पडझड सुरू झाली आहे. भारतात आता लग्न सराईला सुरुवात होईल, त्यापूर्वीच सोन्याने आनंदवार्ता दिली आहे. दिवाळीत सोनं तेजीत होतं. दिवाळीनंतर सोन्याचे दर खाली उतरताना दिसून येत आहेत. (Gold-Silver Rate Today)
या आठवड्याच्या पहिल्या दिवशी किंमत स्थिर होती. तर या मंगळवारी सोने 150 रुपयांनी उतरले होते. तर बुधवारी भाव 150 रुपयांनी वाढले. काल 7 नोव्हेंबर रोजी दर काही अंशी घसरले. आज सकाळच्या सत्रात सोन्याने नरमाईचे संकेत दिले आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 72,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,710 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
तर, या आठवड्यात चांदीत मोठा बदल दिसला नाही. 5 नोव्हेंबर रोजी चांदी 1 हजार रुपयांनी घसरली होती. काल 7 नोव्हेंबररोजी चांदीत पुन्हा 3,000 रुपयांची मोठी घसरण झाली. आज सकाळच्या सत्रातही चांदीमध्ये घसरण दिसून आली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 93,000 रुपये इतका आहे. (Gold-Silver Rate Today)
14 ते 24 कॅरेटचा भाव-
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,780, 23 कॅरेट 76,473, 22 कॅरेट सोने 70,331 रुपयांवर घसरले आहे. तर 18 कॅरेट सोने आता 57,585 रुपये, 14 कॅरेट सोने 44,916 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.
दरम्यान, वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. (Gold-Silver Rate Today)
सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते. (Gold-Silver Rate Today)
News Title – Gold-Silver Rate Today 8 November 2024
महत्त्वाच्या बातम्या-
“…नाहीतर ‘त्याला’ एक महिन्यात संपवू”; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी
“राजसाहेब तुम्हाला बडव्यांनी घेरलंय, वेळीच सावध व्हा..”; ‘या’ नेत्याचं ट्वीट चर्चेत
रवि योगाचा शुभ संयोग ‘या’ 5 राशींना करणार धनवान, मिळणार पैसाच पैसा!
प्रमोद महाजनांच्या हत्येवरून पूनम महाजनांचं मोठं विधान!
18 वर्षांनंतर प्रमोद महाजनांच्या हत्येसंदर्भात खळबळजनक दावा समोर!