Gold-Silver Rate Today | एप्रिल आणि मे या दोन महिन्यात सोन्याच्या दरात प्रचंड वाढ नोंदवली गेली. या दोन महिन्यात किमतीचे अनेक रेकॉर्ड तुटले. सोनं पहिल्यांदाच 75 हजारांच्याही पार गेलं होतं. मात्र, जून महिन्यात याच्या किमती काही प्रमाणात खाली आल्या. जूनमध्ये ग्राहकांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला. तर, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये किमतीमध्ये चढ-उताराचे सत्र दिसून आले.
गेल्या दोन दिवसात दहा ग्रॅम शुद्ध सोन्यात 1500 रुपयांची वाढ होऊन सोन्याचे दर हे जीएसटी (GST) शिवाय 73 हजार 500 रूपयांवर जाऊन पोहोचले आहेत. जागतिक पातळीवर फेडरल बँकांचे व्याजदर कमी (Gold-Silver Rate Today) झाल्याने गुंतवणूकदार हे सोन्याच्या गुंतवणुकीकडे वळले असल्यानं मागणीत वाढ झाल्याचं बोललं जातंय.
सध्या सोन्याचा दर प्रतितोळा 73 हजार 500 रूपयांवर पोहोचला आहे. तसेच आज 9 जुलैरोजी सुवर्णनगरी जळगाव शहरात सोन्याचे दर हे जीएसटी (GST) शिवाय 73 हजार 500 रूपयांवर जाऊन पोहोचले आहेत.
आजचे सोन्याचे दर
अशात पुढच्या काही महिन्यात सोन्याच्या दरात आणखी वाढ होणार असल्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. जगभरातील 81 टक्के केंद्रीय बँका पुढील 12 महिन्यांत आणखी सोन्याची खरेदी करून सोन्याचा साठा वाढवणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे परिणामी सोन्याचे भावही वाढू शकतात.
दरम्यान, इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (Gold-Silver Rate Today)सध्या एक किलो चांदीचा भाव 95,000 रुपये आहे. तसेच 22 कॅरेट सोने 67,600 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,730 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
घरबसल्या जाणून घ्या भाव
दरम्यान, तुम्ही सोने आणि (Gold-Silver Rate Today) चांदीच्या किंमती घरबसल्या पण जाणून घेऊ शकता. स्थानिक कर, इतर करांमुळे प्रत्येक शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते.ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.
News Title : Gold-Silver Rate Today 9 july 2024
महत्त्वाच्या बातम्या-
खरेदीची करा घाई! Maruti Suzuki च्या ‘या’ गाड्यांवर मिळतंय तगडं डिस्काऊंट
“..तर राज्यात तिसरी आघाडी निश्चित”; बच्चू कडू यांचे महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेत
“मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी”, शेतकरी नेत्याची सरकारवर टीका
“पत्नीचा गळा आवळून खून केला, नंतर इलेक्ट्रिक शॉकने..”; धक्कादायक प्रकारामुळे पुणे हादरलं
एलपीजी सिलिंडर ग्राहकांना मोठा दिलासा! केंद्राने केली मोठी घोषणा