सोन्याला पुन्हा झळाळी, ‘इतकी’ झाली दरवाढ; जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Rate Today 9 November 2024

Gold-Silver Rate Today | अमिरिकेत नुकतीच निवडणूक पार पडली आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. यानंतर जगभरातील व्यापारी आणि व्यावसायिक धोरण बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सराफा बाजारासह अनेक गोष्टीवर या निवडणुकीचा परिणाम दिसून येत आहे. देशात मौल्यवान धातू सोन्याला पुन्हा झळाळी आली आहे. सोनं पुन्हा महाग झालं आहे. मागील काही दिवसांत सोन्यात चढ-उतारचे सत्र दिसून येत आहे. (Gold-Silver Rate Today )

सराफा बाजारात सध्या कभी खुशी कभी गम असे वातावरण दिसून येत आहे. या आठवड्यात सोन्यात चढउताराचे सत्र दिसले. या मंगळवारी सोन्यात 150 रुपयांची स्वस्ताई दिसली. दुसऱ्या दिवशी भाव तितकाच वाढला. 7 नोव्हेंबर रोजी 180 रुपयांनी किंमती घसरल्या. तर काल 8 नोव्हेंबरला सोन्याने 900 रुपयांची आघाडी घेतली. आज 9 नोव्हेंबररोजी सोन्याने दरवाढीचे संकेत दिले आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 73,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,620 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

या आठवड्यात चांदी जरा नरमाई दाखवत आहे.  5 आणि 7 नोव्हेंबर रोजी चांदीत अनुक्रमे 1,000 आणि 3,000 रुपयांची घसरण झाली.  मात्र काल 8 तारखेला त्यात पुन्हा 1000 रुपयांची दरवाढ नोंदवली गेली.  गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 94,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव-

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 77,382 23 कॅरेट 77,072, 22 कॅरेट सोने 70,882 रुपयांवर घसरले. तर 18 कॅरेट आता 58,037 रुपये, 14 कॅरेट सोने 45,269 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.

दरम्यान, वायदे बाजार आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. (Gold-Silver Rate Today)

सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते. (Gold-Silver Rate Today)

News Title – Gold-Silver Rate Today 9 November 2024

महत्त्वाच्या बातम्या-

नोव्हेंबर महिना ‘या’ राशींसाठी ठरणार भाग्याचा; शनीदेव करणार मालामाल

अमित शाह यांचं शिवरायांबद्दल पुन्हा वादग्रस्त विधान; म्हणाले, ‘गुलामीच्या काळात..’

देवेंद्र फडणवीस होणार पुढील मुख्यमंत्री?, अमित शाह यांनी दिले मोठे संकेत

आज गोपाष्टमी, श्रीकृष्ण कोणत्या राशींना देणार सुख-समृद्धी?; वाचा राशीभविष्य

19 व्या वर्षी पाचव्या मजल्यावरुन मारली उडी?, ‘या’ अभिनेत्रीच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा

 

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .