Gold-Silver Rate Today | गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतीत मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. विशेषतः चांदीने या आठवड्यात चांगलाच धक्का दिलाय. तर, सोन्याच्या दरातही वाढ झाली आहे. आज 4 मार्च 2025 रोजी 18K, 22K आणि 24K सोन्याचे तसेच एक किलो चांदीचे दर कसे आहेत, ते जाणून घेऊया. (Gold-Silver Rate Today)
सोन्याच्या दरात मोठी वाढ
गेल्या आठवड्यात सोन्याने काही प्रमाणात घसरण दाखवली होती, मात्र आज सकाळच्या सत्रात सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. गुडरिटर्न्सनुसार, आज 22 कॅरेट सोन्याचा दर 79,550 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 86,770 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.
चांदीच्या किमतींमध्ये मोठी उसळी
चांदीच्या दरातही लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात 5000 रुपयांची घसरण झाल्यानंतर, आता चांदीने पुन्हा वाढ दाखवली आहे. गुडरिटर्न्सनुसार, आज एक किलो चांदीचा दर 97,000 रुपये इतका आहे. (Gold-Silver Rate Today)
वेगवेगळ्या कॅरेटनुसार सोन्याचे दर
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, आज सोन्याचे दर असे आहेत:
- 24 कॅरेट: 85,320 रुपये प्रति 10 ग्रॅम
- 23 कॅरेट: 84,978 रुपये प्रति 10 ग्रॅम
- 22 कॅरेट: 78,153 रुपये प्रति 10 ग्रॅम
- 18 कॅरेट: 63,990 रुपये प्रति 10 ग्रॅम
- 14 कॅरेट: 49,912 रुपये प्रति 10 ग्रॅम
- एक किलो चांदी: 94,398 रुपये
सोने-चांदीचे दर घरबसल्या कसे जाणून घ्याल?
ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन विविध कॅरेटच्या सोन्या-चांदीचे दर जाणून घेऊ शकतात. IBJA हे दर दररोज जाहीर करते, मात्र केंद्र सरकारच्या सुट्ट्यांव्यतिरिक्त हे दर अपडेट केले जातात.
Title : Gold-Silver Rate Today Check Latest Rates Here