Gold-Silver Rate Today | बहीण आणि भाऊ या नात्याचा उत्सव म्हणजे रक्षाबंधन. या सणाला बहीण भावाला राखी बांधून भावाकडून आवडते गिफ्ट घेत असते. प्रत्येक मुलगा आपल्या बहिणीला खुश करण्यासाठी या सणाला काहीतरी विशेष भेट देत असतो. आता तुम्ही जर तुमच्या प्रिय बहिणीला सोन्याची वस्तु भेट म्हणून देण्याचा विचार करत असाल, तर (Gold-Silver Rate Today)तुमच्यासाठी एक मोठी गुड न्यूज आहे.
लाडक्या बहिणीला तुम्हाला महागडं गिफ्ट द्यायचं असेल तर सोनं स्वस्त झालं आहे. गेल्या दोन दिवसापासून सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज 16 ऑगस्टरोजी सकाळी देखील घसरणीचे संकेत मिळाले आहेत.
सोने-चांदीचे आजचे दर
या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 12 तारखेला सोने 270 रुपयांनी तर 13 ऑगस्ट रोजी 104 रुपयांनी सोने महागले. 14 ऑगस्ट रोजी किंमती 110 रुपयांनी कमी झाल्या. काल भावात (Gold-Silver Rate Today)कोणताच बदल झाला नाही. आज सकाळच्या सत्रात मोठी घसरण दिसली.
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), आता 22 कॅरेट सोने 65,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. पाहायला गेलं तर सोनं अद्यापही 70 हजारांच्या पुढेच आहे.
चांदीमध्ये सध्या दरवाढीचं चित्र दिसून येतंय. 13 ऑगस्टला चांदीत 1 हजार रुपयांची वाढ झाली. 14 ऑगस्ट रोजी 500 रुपयांनी किंमती उतरल्या. 15 ऑगस्ट रोजी तितकीच दरवाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 83,500 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव-
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 70, 793, 23 कॅरेट 70,510, 22 कॅरेट सोने 64,846 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,095 रुपये, 14 कॅरेट सोने 41,414 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उतरले आहे.
दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर अथवा शुल्क लागू केला जात नाही. मात्र, सराफा बाजारात शुल्क आणि कराचा (Gold-Silver Rate Today) समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
News Title : Gold-Silver Rate Today Today 16 August 2024
महत्त्वाच्या बातम्या-
आज ‘या’ 5 राशींवर लक्ष्मी प्रसन्न होईल, मोठा धनलाभ होणार
जुन्नरमधील शिवनेरी ट्रेकर्सची कामगिरी; स्वातंत्र्यदिनी ‘कांगयात्से’वर फडकवला तिरंगा
‘मोठ्ठ्या ताई, तुम्ही आता आयुष्यभर…’; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळेंना झापलं
माघार की नवा डाव?; बारामती विधानसभेबाबत अजित पवारांचा धक्कादायक निर्णय
लाडक्या बहिणींना वेळेआधीच पैसे!, मंत्री अदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती