ग्राहक आनंदी! सोनं झालं स्वस्त, रक्षाबंधनानंतर ‘इतके’ घसरले भाव

Gold-Silver Rate Today | रक्षा बंधन या सणापुर्वी सोन्याने चांगलीच भरारी घेतली होती. चांदीने देखील मजल मारली होती. आज मात्र, भाव खाली आले आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी सोन्याच्या (Gold-Silver Rate Today)किमती वाढल्या होत्या. मात्र, आज (20 ऑगस्ट) ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमती वाढल्या होत्या. गेल्या बुधवारी सोन्यात 110 रुपयांची घसरण झाली होती. तर इतर दिवशी सोन्याने प्रति 10 ग्रॅममागे एकूण 600 रुपयांची मजल मारली. रविवार आणि सोमवार या दोन दिवसात किमतीमध्ये काहीही बदल झाला नाही.आज सकाळी घसरणीचे संकेत मिळाले आहेत.

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA),आता 22 कॅरेट सोने 66,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,920 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोनं आता 70 हजारांच्या पुढे गेलं आहे. एप्रिल आणि मे महिन्यात सोन्याचे भाव जवळपास 73 हजारांच्या पुढे होते. या दोन महिन्यात सोन्याच्या दरात अनेक विक्रम नोंदवले गेले. या महिन्याचा आलेख बघता दर पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चांदीचे दर काय?

गेल्या आठवड्यात चांदी 4,000 रुपयांनी महागली होती. आठवड्याच्या अखेरीस चांदीने 2,000 रुपयांची मुसंडी मारली होती. तर, या दोन दिवसात किंमतीत कोणताच बदल दिसला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 86,000 रुपये आहे. (Gold-Silver Rate Today)

14 ते 24 कॅरेटचा भाव-

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 71,108, 23 कॅरेट 70,823, 22 कॅरेट सोने 65,135 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,331 रुपये, 14 कॅरेट सोने 41,598 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहेत.

दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर अथवा शुल्क लागू केला जात नाही. मात्र, सराफा बाजारात शुल्क आणि कराचा (Gold-Silver Rate Today) समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

News Title : Gold-Silver Rate Today Today 20 August 2024

महत्त्वाच्या बातम्या-

…तर सीमकार्ड होणार ब्लॅकलिस्ट; सप्टेंबरपासून TRAI आणणार नवा नियम

खुशखबर! राज्यात डिसेंबरमध्ये पुन्हा होणार पोलीस भरती, एकूण पदे किती?

आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल?, जाणून घ्या तुमचे राशी भविष्य

सावधान! झपाट्याने पसरतोय मंकीपॉक्स आजार; जाणून घ्या लक्षणं

… तर फडणवीस राजकारणातून निवृत्त होणार? पदाचा राजीनामा देणार