ग्राहकांना झटका! सोनं पुन्हा 70 हजारांच्या पुढे, जाणून घ्या लेटेस्ट दर

Gold-Silver Rate Today | एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत सोन्याच्या दरात अनेक विक्रम नोंदवले गेले. या दोन्ही महिन्यात सोनं जवळपास 75 हजारांवर पोहोचलं होतं. त्यानंतर जून आणि जुलै महिन्यात किमती खाली आल्या होत्या. मात्र, ऑगस्ट महिन्यात किमतीचा वाढता आलेख दिसून येतोय. या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सोन्याचे (Gold-Silver Rate Today)दर वरचढ आहेत. आज 22 ऑगस्टरोजी देखील सोन्याने ग्राहकांना झटका दिलाय.

या आठवड्यात सोन्याने जोरदार आघाडी उघडली आहे. तर चांदीने काही अंशी दिलासा दिला आहे. गेल्या आठवड्यात सोन्याने 600 रुपयांची दरवाढ नोंदवली होती. या आठवड्याच्या चौथ्या दिवशी सोनं पुन्हा महागलं आहे.

दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 20 ऑगस्ट रोजी सोन्यात 120 रुपयांची घसरण झाली. 21 आणि 22 ऑगस्ट रोजी सोने अनुक्रमे 550 आणि 10 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,260 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,360 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोनं आता 70 हजारांच्याही पुढे गेलं आहे.

चांदीचा दिलासा

मागच्या आठवड्यात चांदीमध्ये 4 हजारांची वाढ झाली होती. तर, 20 आणि 21 ऑगस्टरोजी कोणताही बदल झाला नाही. आज 22 ऑगस्टरोजी चांदी अवघ्या 100 रुपयांनी उतरली आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 86,900 रुपये आहे. (Gold-Silver Rate Today)

14 ते 24 कॅरेटचा भाव काय?

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 71,719, 23 कॅरेट 71,432, 22 कॅरेट सोने 65,695 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,789 रुपये, 14 कॅरेट सोने 41,956 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.

दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर अथवा शुल्क लागू केला जात नाही. मात्र, सराफा बाजारात शुल्क आणि कराचा (Gold-Silver Rate Today) समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

News Title : Gold-Silver Rate Today Today 22 August 2024

महत्त्वाच्या बातम्या-

“..तर मी स्वतः आंदोलनात उतरेल”; MPSC विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात

बदलापूर घटनेनंतर राज्य सरकारने शाळांबाबत घेतला मोठा निर्णय!

व्यवसायात भरभराट ते धनप्राप्तीचा योग, ‘या’ राशींचे येणार सोनेरी दिवस

डेबिट किंवा क्रेडिट कार्ड हरवलयं तर अशाप्रकारे ब्लॉक करा, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

भाजपकडून बदलापूर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, नाना पटोलेंचा धक्कादायक आरोप