सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण!, जाणून घ्या ताजे दर

नवी दिल्ली | सोने-चांदीच्या दरात (Gold-Silver Rates) सातत्याने चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, सोमवारी सोन्याच्या (Gold) दरात मोठी घसरण झाल्यानंतर आज मंगळवारी पण सोन्याचे दर कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

सोन्याच्या दरात होणाऱ्या चढ-उतारामुळे अनेकजण सोनं खरेदी करण्याआधी खूप विचार करतात. पण आता तुम्ही सोनं खरेदी करण्याच्या विचारात असाल तर सोनं खरेदीची हीच वेळ आहे.

सध्या सोनं हे आतापर्यंतच्या विक्रमी दरापेक्षा पण स्वस्तात विकलं जात आहे. मंगळवारी सराफा बाजारात सोन्याचे नवीन दर काय आहेत ते जाणून घेऊ.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार, मंगळवारी 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत 10 रुपये प्रति दहा ग्रॅमची घसरण झाली आहे. त्यानंतर आज सोन्याचा भाव हा 49,600 रूपये प्रति दहा ग्रॅमवरून 49,590 रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला आहे.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार सध्या चांदीचा भाव 69,300 रुपये प्रति किलो आहे. तर गेल्या ट्रेडमध्ये चांदीची किंमत 69,500 रुपये प्रतिकिलो इतकी होती.

दरम्यान, 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत पण प्रति दहा ग्रॅममागे 10 रूपयांची घसरण झाली आहे. त्यानुसार मंगळवारी 24 कॅरेट सोन्याची किंमत 54,100 इतकी झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-