दसऱ्याच्या आधीच सोनं झालं स्वस्त?, काय आहेत सध्या 10 ग्रॅमचे भाव?

Gold-Silver Today Price | नवरात्री उत्सव सुरू होताच सोनं आणि चांदी या दोन्ही धातूमध्ये दरवाढ नोंदवली गेली. आज नवरात्रीचा सातवा दिवस आहे. आता दसरा या सणाला फक्त दोन दिवस बाकी आहेत. त्यापूर्वीच ग्राहकांना आनंदवार्ता मिळाली आहे. आज 9 ऑक्टोबररोजी सकाळच्या सत्रात सोनं खाली आल्याचं दिसून आलं. त्यामुळे आजच सोनं खरेदी करून तुम्ही दसऱ्याच्या मुहूर्तावर घरी आणू शकता. (Gold-Silver Today Price )

सध्या सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव कमी झाला आहे. त्यामुळे आज तुम्हाला 1 ग्रॅम सोन्यासाठी 7,114 रुपये मोजावे लागतील. 8 ग्रॅम सोन्यासाठी 56,912 रुपये लागतील. तर एक तोळा सोन्यासाठी 71,140 रुपये मोजावे लागतील. 24 कॅरेट सोनं सध्या 77,590 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेट सोन्यामध्ये 1 ग्रॅमचा भाव हा 7,759 रुपये आहे.

याचबरोबर 18 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 58,210 रुपये आहे. मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,099 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,784 रुपये आहे. (Gold-Silver Today Price )

सध्या चांदीचे दर स्थिर आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 97,000 रुपये आहे. राज्यातील विविध शहरांत देखील चांदीचा हाच भाव आहे. दरम्यान, वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर किंवा शुल्क लागू केला जात नाही. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. (Gold-Silver Rate Today )

22 आणि 24 कॅरेटमधील फरक काय?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध सोने मानले जाते. 22 कॅरेट सोने तांबे, चांदी, जस्त यांसारखे 9% इतर धातू जोडून तयार केले जाते. 24 कॅरेट सोने चमकदार असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाही. त्यामुळे बहुतांश दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात. ( Gold-Silver Today Price )

सोन्याची शुद्धता कशी ओळखणार?

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिला जातो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले जाते. (Gold-Silver Today Price)

News Title – Gold-Silver Today Price 9 October 2024

महत्त्वाच्या बातम्या-

“महाराष्ट्रात हरियाणाची पुनरावृत्ती होणार”; देवेंद्र फडणविसांचा विश्वास

आमदार बनलेल्या विनेश फोगाटची एकूण संपत्ती किती?, समोर आला आकडा

आज नवरात्रीचा सातवा दिवस, देवी कालरात्री ‘या’ राशींना देणार सुख समृद्धी!

अजित पवारांना गुलीगत धोका; ‘हा’ बडा नेता साथ सोडणार

राज्यात खळबळ! ‘या’ माजी आमदारास पोलिसांनी ठोकल्या बेड्या