बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पोस्टात नोकरीची सुवर्णसंधी, 10वी उत्तीर्ण आहात तर ही बातमी तुमच्यासाठीच

नवी दिल्ली | नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूणांसाठी नोकरीची सुर्णसंधी आहे. इंडिया पोस्ट भरती अंतर्गत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, झारखंड, हरियाणा, छत्तीसगढ आणि भारतीय पोस्ट विभागाच्या मंडळांमध्ये असलेल्या पोस्ट ऑफिसमध्ये (Post Office) सुमारे 39,000 पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ग्रामीण डाक सेवकांच्या 39,000 पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू आहे. इंडिया पोस्ट जीडीएस भरती 2022 साठी उमेदवार अर्ज अधिकृत जीडीएस (GDS) पोर्टलवर करू शकतात.

या पदांसाठी उमेदवारांचे वय 18 ते 40 मध्ये असणे अनिवार्य आहे. देशभरातील टपाल विभागाच्या विविध मंडळांनुसार दहावीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. या यादीनुसार उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी आमंत्रित केलं जाणार आहे.

दरम्यान, कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण झालेले उमेदवार indiapostgdsonline.gov.in या अधिकृत पोर्टलवर जाऊन पदांसाठी अर्ज भरू शकतात. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 जून 2022 निश्चित करण्यात आली आहे. तर उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे.

थोडक्यात बातम्या-

यंदाही चक्रीवादळ धडकणार, ‘या’ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा जारी

‘…तर पुतिन यांची हत्या होऊ शकते’, धक्कादायक माहिती समोर

मोठी बातमी! जेलमधून सुटताच राणा दांपत्य घेणार ‘या’ भाजप नेत्याची भेट

पेट्रोल-डिझेलच्या दरात आज काय बदल झाले?, वाचा आजचे ताजे दर

Weather Update: राज्यात अवकाळी पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More