नवी दिल्ली | पोस्टात (India Post) नोकरी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. इंडिया पोस्ट दिल्लीमध्ये मेल मोटर सर्व्हिस विभागांतर्गत स्टाफ कार ड्रायव्हरच्या पदांसाठी अर्ज निघाले असून या पदांसाठी अर्ज भरण्यासाठी फक्त चार दिवस शिल्लक राहिले आहेत.
या भरती अंतर्गत एकूण 29 पदे भरती केली जाणार आहे. ही 29 पदे सामान्य श्रेणीतील कार चालकाची आहेत. या पदांसाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी केलेली असावी. तसेच हलक्या आणि अवजड मोटार वाहनांसाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि तीन वर्षांचा अनुभव असणे अनिवार्य आहे.
या पदांसाठी पोस्टाकडून उमेदवारांची वयोमर्यादाही जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांचं वय हे 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असणे बंधनकारक आहे. तर या पदांसाठी 19,900 ते 63,200 रूपयांपर्यत पगार मिळू शकतो.
दरम्यान, तुम्ही या नोकरीसाठी इच्छुक आणि पात्र असाल तर indiapost.gov.in या पोस्टाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज भरू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च असून उमेदवारांची निवड ही अनुभव आणि कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाणार आहे.
थोडक्यात बातम्या-
जो बायडन यांच्या तिसऱ्या महायुद्धाबद्दलच्या वक्तव्याने जगाचं टेन्शन वाढलं, म्हणाले…
“मला असा संशय येतोय की पवारसाहेबच दाऊदचा माणूस आहे”
Budget 2022: तृतीयपंथीयांसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
Budget 2022: छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी तब्बल ‘इतक्या’ कोटींचा निधी जाहीर
‘राऊत आमच्या तरूण भारतमध्ये येतील पण…’, चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
Comments are closed.