‘या’ बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | वाढत्या स्पर्धेच्या जगात नोकरी मिळवण्यासाठी सगळे प्रयत्न करत असतात. त्यामुळे तुम्ही जर बँकेत (Bank) नोकरी करण्याची संधी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

बँक ऑफ महाराष्ट्राने (Bank of Maharashtra) 2022 साठी अधिसूचना जारी केली आहे. अधिक माहितीसाठी bankofmaharashtra.in च्या अधिकृत लिंकवर जाऊन तुम्ही पाहू शकता. तेथे जाऊन तुम्ही अर्ज देखील भरु शकता.

या पदांसाठी तुम्ही ऑनलाइन (Online) अर्ज करु शकता. या भरती अंतर्गत 500 पेक्षा अधिक जागांसाठी भरतीच्या जागा निघल्या आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2022 ही आहे. ऑनलाईन अर्ज स्विकारले जाणार आहेत.

या भरती प्रक्रियेअंतर्गंत 551 पदांसाठी जागा निघल्या आहेत. या भरतीअंतर्गत जर्नलिस्ट ऑफिसर पदासाठी 500 जागा रिक्त आहेत. चीफ मैनेजर (Chief Manager) पदासाठी 23 तर असिस्टेंट जनरल मॅनेजर (Assistant General Manager) पदासाठी 3 जागा रिक्त आहेत. 25 जागा फाॅरेक्स/ट्रेजरी ऑफिसर पदासाठी निघाल्या आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन परिक्षा घेण्यात येणार आहेत. या परिक्षेत उर्त्तीर्ण झाल्यास उमेदवाराला पुढील परिक्षेसाठी बोलावण्यात येणार आहे. त्यानुसार ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही परिक्षेतंर्गत निकाल देण्यात येणार आहे.

अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबधित विषयाची डिग्री असणं गरजेचं आहे. याशिवाय काही वर्षाचा अनुभव असणंदेखील गरजेचं आहे. पात्र उमेदवारांची वयोमर्यांदा पोस्टनुसार वेगळी आहे. अधिक माहिती बँक ऑफ महाकराष्ट्राच्या अधिकृत बेवसाईटवर देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या