बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुयश टिळक अन् आयुषी भावेच्या हळदीचे सोनेरी क्षण, पाहा फोटो

मुंबई | ‘का रे दुरावा’, ‘शुभमंगल ऑनलाईन’ यासारख्या मालिकांमधून लोकप्रिय झालेला अभिनेता सुयश टिळकने आयुषी भावेच्या वाढदिवसादिवशी चाहत्यांना खुशखबर दिली आहे. आयुषी आणि सुयशच्या मेहंदी आणि हळदीचा कार्यक्रम नुकताच पार पडला आहे. दोघांनीही इन्स्टाग्रामवर त्यांच्या हळदीचे फोटो स्टोरीला शेअर केले आहेत.

सुयशने नुकताच त्याच्या गर्लफ्रेण्डसोबत हळदीचा समारंभ पार पाडला आहे. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला आहे.

जुलै महिन्यात दोघांनी चाहत्यांना सुखद धक्का देत साखरपुडा केला होता. त्यावेळी देखील त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते.

आयुषी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अशात सुयशसोबतच आयुषीनेही हळदीचे फोटो शेअर केले आहेत.

आयुषी भावे ही 2018 मध्ये महाराष्ट्राची श्रावणक्वीन किताबाची मानकरी ठरली होती.

त्यानंतर आयुषीने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं युवा डान्सिंग क्विन या टीव्ही शोमध्ये आयुषी सहभागी झाली होती. आयुषी भावे लवकरच मराठी सिनेसृष्टीतही पदार्पण करणार आहे.

Photo Courtesy – Instagram\ Ayushi

थोडक्यात बातम्या-

भाजपने राज ठाकरेंच्या नादाला लागून मनसेशी युती करु नये – रामदास आठवले

देशातील नव्या कोरोना रूग्णांच्या संख्येत काही प्रमाणात वाढ, पाहा ताजी आकडेवारी

आधी कुत्रा माणसाला चावला मग माणूस कुत्र्याला चावला अन् नंतर…

राज्यातील महाविद्यालये आजपासून सुरू, मात्र पुणे जिल्ह्यांबाबत अजून शंकाच

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचा पुन्हा भडका, या महिन्यातील आज 15वी दरवाढ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More