बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आरोग्य विभागात नोकरीची सुवर्णसंधी; ‘इतक्या’ हजार पदांसाठी भरती, वाचा सविस्तर

मुंबई | कोरोना महामारीचं संकट कमी होत जाईल तशा सरकारी नोकऱ्यांच्या संधी वाढत आहेत. अलिकडे अनेक सरकारी नोकऱ्यांच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. अशातच आता महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने देखील बंपर भरतीची घोषणा केली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने नुकतीच ड गटाच्या भरतीबद्दल मोठी घोषणा केली आहे. राज्यभरात आरोग्य विभागाच्या ड वर्गातील तब्बल 3 हजार 466 जागांच्या भरतीसाठीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामुळे आरोग्य विभागात काम करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी मानली जात आहे.

या परीक्षेसाठी विद्यार्थी 9 ऑगस्टपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करु शकणार आहेत. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट आहे. आरोग्य विभागाकडून ही परीक्षा देण्यासाठी लागणाऱ्या शैक्षणिक पात्रतेची माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे.

दरम्यान, अर्ज दाखल करणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षांच्या आधारे होणार आहे. या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नाही. मात्र, लवकरच विभागाकडून तारीख देखील जाहीर केली जाईल.

थोडक्यात बातम्या –

‘नावात काय आहे’ म्हणणाऱ्यांना झटका, ‘हे’ नाव असेल तर 501 रुपयांचं पेट्रोल फुकट मिळणार!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रासोबत चर्चा करायला पाहिजे होती – रावसाहेब दानवे

‘सत्ता आली तरी तुम्ही आम्ही कोण तर कपबश्या धुणारे’; ठाकरे सरकारमधील मंत्र्यानं दिला घरचा आहेर

‘…तर सिनेमाचं तिकिट आणि पाॅपकाॅर्न मिळणार फ्री’; पीव्हीआरची भन्नाट ऑफर

मनसेकडून ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयाचं स्वागत!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More