गुगल पिक्सल 8a स्मार्टफोन खरेदीची सुवर्णसंधी; किमतीत मोठी कपात

Golden Opportunity to Buy Google Pixel 8a at a Discounted Price (1)

Google Pixel 8a | तुम्ही जर दमदार फिचर्स आणि पॉवरफुल कॅमेरा (Powerful Camera) असलेला बजेट फोन (Budget Phone) शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कमी किमतीत प्रीमियम (Premium) श्रेणीतील गुगल पिक्सल स्मार्टफोन खरेदी करण्याची ही एक उत्तम संधी आहे. गुगल स्मार्टफोनबद्दल ग्राहकांच्या मनात नेहमीच क्रेझ असते. सामान्य अँड्रॉइड स्मार्टफोनच्या (Android Smartphone) तुलनेत या फोनचे फीचर्स थोडे वेगळे आणि सरस असतात. (Google Pixel 8a)

स्वस्तात फोन खरेदी करायची संधी!

गुगल पिक्सल स्मार्टफोन महाग असल्याने अनेकजण ते खरेदी करण्यास कचरतात. परंतु, आता तुम्हाला फक्त १६ हजार रुपयांमध्ये गुगल पिक्सल 8 सिरीजमधील (Google Pixel 8 Series) एक पॉवरफुल फोन खरेदी करण्याची संधी आहे.

अमेझॉनवर घसघशीत सूट आणि आकर्षक ऑफर्स

ई-कॉमर्स (E-commerce) वेबसाईट अमेझॉनवर सध्या प्रीमियम श्रेणीतील स्मार्टफोनवर उत्तम डील्स (Deals) उपलब्ध आहेत. अमेझॉनने गुगल पिक्सल 8 मालिकेतील पिक्सल 8a स्मार्टफोनच्या किमतीत मोठी कपात केली आहे. त्यामुळे ग्राहकांना या संधीचा फायदा घेता येणार आहे. सेल्फी (Selfie) काढण्याची किंवा फोटोग्राफीची (Photography) आवड असणाऱ्यांसाठी कमी किमतीत पिक्सल 8a स्मार्टफोन खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे. (Google Pixel 8a)

गुगल पिक्सल 8a च्या किमतीत घसरण

अमेझॉनवर गुगल पिक्सल 8a सध्या ४९ हजार ९९९ रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. परंतु, सध्या अमेझॉन ग्राहकांना यावर २२% सूट देत आहे. या डिस्काउंट ऑफरसह (Discount Offer) तुम्ही हा फ्लॅगशिप स्मार्टफोन (Flagship Smartphone) फक्त ३८ हजार ९९९ रुपयांना खरेदी करू शकता. याशिवाय, जर तुम्ही ICICI बँक कार्डद्वारे (ICICI Bank Card) पेमेंट केले तर तुम्हाला ५% कॅशबॅक ऑफर (Cashback Offer) देखील मिळेल. ही ऑफर गुगल पिक्सल 8a च्या 128 जीबी व्हेरिएंटवर (128 GB Variant) उपलब्ध आहे.

फक्त १६ हजारात खरेदी करा गुगल पिक्सल 8a

तुम्ही हा स्मार्टफोन फक्त १६ हजार रुपयांना खरेदी करून घरी घेऊन जाऊ शकता. यासाठी तुम्हाला काही अटी पूर्ण कराव्या लागतील. अमेझॉन ग्राहकांना यावर २२ हजार ८०० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर (Exchange Offer) देत आहे. तुमचा जुना फोन एक्सचेंज करून तुम्ही २२ हजार ८०० रुपयांपर्यंत बचत करू शकता. जर तुम्हाला या ऑफरची पूर्ण किंमत मिळाली तर तुम्हाला गुगल पिक्सलचा हा फोन १६ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. (Google Pixel 8a)

Title : Golden Opportunity to Buy Google Pixel 8a at a Discounted Price

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .