बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्याला हादरवणाऱ्या गोल्डनमॅन समीर मसूर हत्या प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई!

पुणे | पुण्यात भरदिवसा सोमवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास गोळ्या झाडून एकाची हत्या करण्यात आली. गोल्डनमॅन म्हणून ओळख असलेल्या समीर हुसेन मसूर याच्यावर काही जणांनी गोळ्या झाडून त्याची हत्या केली. भारती विद्यापीठ ठाण्याच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला आहे. या घटनेनंतर पुणे शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

याप्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यांपैकी एकाला ताब्यात घेण्यात यश आलं आहे. तर इतर 2 जण पळून गेले आहेत. पोलिस या दोघांचा शोध घेत आहेत. ताब्यात घेतलेला आरोपी हा समीर याचा मित्रच असल्याचं समोर आलं आहे. आर्थिक व्यवहारातून हा खून झाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

आरोपींनी कट रचत ही हत्या घडवून आणली आहे. समीर घरापासून निघाला तेव्हापासूनच आरोपी समीरचा पाठलाग करत होते. त्यानंतर समीर चंद्रभागा चौकात थांबला. त्यावेळी आरोपींनी समीरच्या पाठीमागून  त्याच्यावर गोळीबार केला. आरोपींनी समीरवर तब्बल 6 गोळ्या झाडल्या होत्या. डोक्याला गोळी लागल्याने समीरचा मृत्यू झाला.

दरम्यान, समीर आणि ताब्यात घेतलेला आरोपी मेहबूब सैफन बनोरगी यांच्यात 6 ते 7 महिन्यांपूर्वी वाद झाला होता. पैसाच्या देवाण- घेवाणीतून हा वाद झाला होता. त्यावेळी इतर काही जणांनी मध्यस्थी केल्याने हा वाद मिटला होता. मात्र, मेहबूब याने याच वादातून इतर 2 जणांच्या मदतीने हत्या घडवून आणली. यातील इतर 2आरोपी हे जनता वसातमधील आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘या’ कारणामुळे कतरिना कैफ आणि विकी कौशल विरोधात तक्रार दाखल

महाराष्ट्रात कोरोना खरंच वाढतोय का?, जाणून घ्या आजची आकडेवारी

“शिवसेना म्हणजे डबल ढोलकी”, चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला

शेकोट्या पेटल्या! ‘या’ तारखेनंतर थंडी आणखी वाढण्याची शक्यता

“…तर OBC आरक्षण परत मिळू शकतं”, फडणवीसांनी सांगितला फाॅर्म्युला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More