नवी दिल्ली| कोरोनानं जगभरात धुमाकूळ घातला आहे. गोमुत्र प्यायल्यानं कोरोनाची लागण होत नाही असा दावा पश्चिम बंगालच्या भाजप कार्यकर्त्याने केला होता. याच पार्श्वभूमीवर त्याने गोमुत्र पिण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, गोमुत्र प्यायल्याने एक व्यक्ती आजारी पडला आहे. याप्रकरणी आयोजक भाजप कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे.
या पार्टीत 200 लोक सामील झाले होते आणि त्यांनी गोमुत्र प्राशन केलं होतं असं बोललं जातं आहे. गोमुत्र प्यायल्याने कोरोना होत नाही असा दावा केला होता. तसेच संपूर्ण देशात अशा प्रकारचे गोमुत्र पार्टीचे आयोजन करण्यात येईल असं अखिल भारतीय हिंदू महासभेने सांगितलं होतं.
दरम्यान, देशातील नागरिकांना कोरोनापासून सावध राहण्याचं आवाहन सर्व माध्यमांतून केलं जात आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकार खबरदारीनं पावलं उचलत आहे.
देशातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 130च्या वर गेली असून. कोरोनामुळं देशभरात 3 जणांचा मृत्यु झाला आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
कोरोनाला पिटाळण्यासाठी कैदीही झाले सज्ज; तयार करणार लाखो मास्क!
“…तर नाईलाज झाल्यास कठोर निर्णय घेऊ- राजेश टोपे
महत्वाच्या बातम्या-
“भीमा कोरेगावची दंगल सुनियोजित; शरद पवार आयोगासमोर साक्ष देतील”
कोरोनाने उभी बाटली केली आडवी; 31 मार्चपर्यंत पुण्यातली दारूची दुकाने बंद!
महागडे सॅनिटायझर खरेदी करू नका आणि मास्कही वापरू नका; तुकाराम मुंढेंनी सांगितल्या सोप्या टिप्स
Comments are closed.