‘गोंदण विठुरायाचं’ची राष्ट्रीय पातळीवर दखल, चार नामाकनं

मुंबई | ‘गोंदण विठुरायाचे’ या लघुचित्रपटाची राष्ट्रीय पातळीवरच्या नवनिर्माण चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली आहे. अंतिम २० लघुचित्रपटांमध्ये निवड होऊन या लघुचित्रपटाला ४ नामांकनं मिळाली आहेत.

ऐन वारीच्या काळात मिळालेली ही एक गोड बातमी म्हणावी लागेल.

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक(दिनेश वसंतराव आखाडे), सर्वोत्कृष्ट संकलन(आशिष सावंत, विराज मोरे, मिहीर पोतनीस), सर्वोत्कृष्ट संगीत(सिद्धेश कुलकर्णी ) आणि सर्वोत्कृष्ट बाल कलाकार(सार्थक कांचन) या चार प्रकारात या लघुचित्रपटाला नामांकनं मिळाली आहेत. माऊली गाथा फिल्सने या लघुचित्रपटाची निर्मिती केलीय. 

पाहा या लघुचित्रपटाची झलक-

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या