Top News मनोरंजन

‘चांगला कलाकार चांगली व्यक्ती असेलच असं नाही’; स्वरा भास्करचा कंगणाला टोला

नवी दिल्ली | अभिनेत्री स्वरा भास्करने पुन्हा एकदा अभिनेत्री कंगणा राणावतवर निशाणा साधलाय. एक चांगला कलाकार चांगला माणूसही असेल असं गरजेचं नसल्याचं स्वराने म्हटलंय.

एका मुलाखतीदरम्यान स्वराला कंगणाच्या बाबतीत, ‘एका चांगला कलाकार एक चांगला माणूस असतो’ असं विचारण्यात आलं. त्यावेळी स्वरा म्हणाली, “माझ्या मते, कंगनाचंच या स्टेटमेंटसोबत काही देणं-घेणं नाही. आधीही आमच्यात बराच वाद झाला.”

स्वरा पुढे म्हणाली, “एखादी भूमिका चांगली साकारण्याचा अर्थ म्हणजे त्या अभिनेत्यामध्ये टॅलेंट आहे. तो त्याच्या कामात चांगला आहे. परंतु हे गरजेचं नाही की, ती व्यक्ती खऱ्या आयुष्यातही चांगली व्यक्ती असेल.”

कंगणाने शेतकरी आंदोलनावरून टिप्पणी केली होती. त्यावेळी देखील कंगणाच्या वक्तव्याचा स्वरा भास्करकडून निषेध करण्यात आला होता.

थोडक्यात बातम्या-

“तुमच्या कुंडल्या हाती येणार नाहीत याची काळजी घ्या, त्याचं वाचन सुरु झालं तर…”

“अशोक चव्हाण यांच्यासारखा निष्क्रिय माणूस पाहिला नाही”

उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी तर आदित्य ठाकरेंनी राजीमाना द्यावा- भाजप

ठाकरे सरकारला धक्का! कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचं काम थांबवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

“गप बसून उपमुख्यमंत्रिपद भोगलं असतं तर काय वाटलं नसतं पण इतक्या अभिमानाने हा माणूस कसा वागू शकतो?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या