बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शुभमंगल सावधान! अखेर राहुल-दिशा अडकले लग्नबंधनात

मुंबई | बिग बाॅस रिअॅलिटी शोमधून चांगलाच चर्चेत आलेला चेहरा म्हणजे गायक राहुल वैद्य. गेल्या दोन दिवसांपासून राहुल आणि त्याची गर्लफ्रेंड दिशाच्या लग्न समारंभातील फोटो आणि व्हिडिओंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अखेर आज म्हणजेच 16 जुलैला त्यांचं लग्न पार पडलं आहे.

नुकतेच राहुल आणि दिशाचे लग्नातील सुंदर व्हिडीओज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कोरोनाच्या काळात प्रशासनानं सांगितलेल्या नियमांचे पालन करुन त्यांचा लग्नसोहळा पार पडला आहे. बिग बॉसच्या घरात राहुलने दिशाला प्रपोज केलं होतं. त्यानंतर ही जोडी सोशल मीडियावर चांगलीच हीट ठरली.

 

टीव्ही मनोरंजन आणि बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी देखील त्याच्या लग्नाला शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल आणि दिशाच्या या व्हिडीओजला खूप पसंती मिळते आहे.

दरम्यान,  मुंबईतील हयात हॉटेलमध्ये त्या दोघांचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पहायला मिळत आहे. या जोडीची सोशल मीडियावर मोठी फॅनफॉलोइंग असून ते नेहमीच चर्चेत असलेले पाहायला मिळतात.

 

थोडक्यात बातम्या – 

‘पुण्याची मस्तानी जगात भारी, तसा आमचा मुख्यमंत्री जगात भारी’; मनसेचा उद्धव ठाकरेंना टोला

ते तर केवळ… पूजा चव्हाणच्या आई-वडिलांचा जबाबात धक्कादायक गौप्यस्फोट

ईपीएफओची मोठी कारवाई! पंकजा मुंडेंच्या साखर कारखान्याचे बँक खाते सील

‘मला तैमूरचं डायपर देखील बदलता येत नव्हतं’; करीनाने सांगितला आईपणातला अनुभव

‘गोंधळ आघाडीतला नवा तमाशा’; अतुल भातखळकरांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More