‘आदित्य ठाकरेंचं लवकर शुभमंगल होवो आणि…’; भाजप खासदाराच्या खास शुभेच्छा
मुंबई | राज्याचे पर्यटन मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर आहेत. गेल्या काही दिवसांपासूनच आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची तयारी सुरू होती. आदित्य ठाकरेंनी इस्कॉन मंदिरामध्ये पुजा देखील केली आहे. आम्ही पहिले मंदिर आणि फिर सरकार, अशी घोषणा दिली होती. आता श्रीरामाचे मंदिर बनत आहे. राजकारण करण्यासाठी नाही तर दर्शन घेण्यासाठी आलो आहे, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यातच आता भाजपचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी आदित्य ठाकरेंच्या लग्नाविषयी भाष्य केलं आहे.
प्रभु श्रीरामाचे ते दर्शन घेत आहेत ही अतिशय चांगली गोष्ट आहे. मी सिद्धीविनायकाला जाऊन आलो. त्यावेळेस प्रभु रामचंद्राकडे प्रार्थना केली की, आदित्य ठाकरेंचे लवकर शुभमंगल होवो आणि सीतामाई सारखीचं सुनबाई आम्हाला मिळो, असं अनिल बोंडे म्हणाले आहेत. तसेच आदित्य ठाकरे माझ्या मुलाच्या वयाचे आहेत. विदर्भातील सुन असेल तर फारचं चांगले होईल, असंही अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे.
विदर्भातील मुली अतिशय चांगल्या असतात. जिजाऊ माँसाहेब या विदर्भातल्या होत्या. जिजाऊ माँसाहेब होत्या म्हणूनचं छत्रपती शिवराय आपल्याला देवासारखे मिळाले. त्यांचं आजोळ सुद्धा विदर्भातील आहे. त्यामुळे विदर्भातील असतील तर फारचं चांगलं आहे,असं अनिल बोंडे म्हणाले आहेत.
दरम्यान, अयोध्येत महाराष्ट्र सदनासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे जागा मागणार आहोत. तशी सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला केली आहे. त्यासाठी आवश्यक असलेला पत्रव्यवहार आम्ही योगी आदित्यनाथ यांच्यासोबत करणार आहोत, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
“रामाकडे जावा नाहीतर काशीला, राज्यातील जनतेच्या मनातून तुम्ही संपलेले आहात”
सोनं-चांदीच्या दरात आज काय बदल झाले?, वाचा आजचे दर
ईडी चौकशीला गैरहजेरी लावत अनिल परब साईचरणी लीन
‘औरंगाबादचा औरंगजेब माझ्या मागे लावून दिला’; रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
अंगठीने घेतला जीव; गिफ्ट मागितलं म्हणून प्रियकराने प्रेयसीला संपवलं
Comments are closed.