बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शुभमंगल सावधान! अखेर विकी-कतरिना अडकले लग्नबंधनात

जयपूर | कलासृष्टीत मागील काही काळात अनेकांचे लग्न सोहळे झालेले पहायला मिळाले. अनेक मोठमोठ्या कलाकारांनी लग्नगाठ बांधली आहे. अशातच आता आणखी एक लोकप्रिय जोडी अभिनेता विकी कौशल (Actor Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Actress Katrina kaif) लग्नबंधनात अडकली आहे.

राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्टमध्ये हा विवाह सोहळा पार पडला आहे. या लग्नात दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि जवळे मित्रचं उपस्थित होते. सध्या त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या लग्नात सेल्फी काढण्यास देखील मनाई करण्यात आली आहे.

Amazon Prime Videoने विकी -कतरिनाच्या लग्नाचे टेलिकास्ट हक्क 80 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. कॅट आणि विकीने लग्नाआधीच Amazon Primeला टेलिकास्टचे हक्क विकले होते. जोडप्याने त्यांच्या सर्व पाहुण्यांना नॉन डिस्क्लोजर अ‍ॅग्रीमेंट (NDA) वर स्वाक्षरी करण्यासाठी देखील आणले आहे.

दरम्यान,विकी आणि कतरिनाच्या लग्नाला अनेक बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लावली होती. त्याचवेळी, अभिनेता अक्षय कुमार आणि सारा अली खान संध्याकाळी उशिरा लग्नात पोहचले होते. अशातच आता विकी-कतरिनाचे फॅन्स त्यांच्या लग्नाच्या फोटो आणि व्हिडीओची आतुरतेने वाट पाहत आहेत.

थोडक्यात बातम्या-

“शरद पवारांचं ठरलंय, 2024 मध्येही उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री करायचंय”

शेतकरी आंदोलन अखेर मागे! मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या पाच मागण्या मान्य

आधी अल्टीमेटम, मग हकालपट्टी! आता बीसीसीआय म्हणते, “Thank you Kohli”

“दुनिया में चु*** कमी नही”, व्हिडीओ शेअर करत संजय राऊत म्हणतात…

धक्कादायक! हेलिकॉप्टर अपघातग्रस्तांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा Accident

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More