…आणि ‘गुड मॉर्निंग’ मेसेज पाठवणाऱ्यांचे धाबे दणाणले!

मुंबई | व्हॉट्सअॅपवर सकाळ-संध्याकाळ शुभेच्छा देणाऱ्यांमुळे अनेकजण वैतागले आहेत. मात्र या अशा बहाद्दरांपासून काही काळ का होईना अनेकांना सुटका मिळाली होती. 

व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेल्या एका फेक मेसेजमुळे असे मेसेज पाठवणारांचे धाबे दणाणले होते. हा मेसेज शांघाय इंटरनॅशनल न्यूजकडून आल्याचा दावा करण्यात आला होता. यामध्ये गुड मॉर्निंग टाईपच्या मेसेजेसच्या छायाचित्रांवर एक कोड असून ज्यामुळे तुमची ऑनलाईन फसवणूक होते, असा दावा करण्यात आला होता.

दरम्यान, हा मेसेज फेक असल्याचं समोर आलंय. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ ‘गुड मॉर्निंग’, ‘गुड इव्हिनिंग’ पाठवणारे पुन्हा सुरु झालेत.