गुड मॉर्निंग मेसेजेसमुळे तीनपैकी एक स्मार्टफोन ‘आऊट ऑफ स्पेस’!

वॉशिंग्टन | गुड मॉर्निंग मेसेज पाठवणाऱ्यांमुळे भलेभले त्रस्त आहेत. त्यातच या असल्या मेसेजेसमुळे भारतातील तीनपैकी एका स्मार्टफोनची स्टोरेज क्षमता संपलेली असते, असं एका अहवालातून समोर आलंय. 

गुगलने ही समस्या शोधून काढली आहे. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’नं यासंदर्भात वृत्त दिलंय. या संशोधनानूसार गुगलवर ‘गुड मॉर्निंग’साठी फोटो शोधणाऱ्यांच्या संख्येत गेल्या 5 वर्षात तब्बल 10 पटींनी वाढ झाली.. 

दरम्यान, काही लोक सकाळ संध्याकाळ ‘गुड मॉर्निंग’, ‘गुड नाईट’ अशा प्रकारचे मेसेज पाठवत असतात. यामध्ये विविध प्रकारची फुलं, पक्षी, सूर्य, चंद्र लहान मुलं, अभिनेते, अभिनेत्री किंवा देवदेवता यांचे फोटो असतात. अशा मेसेजेमुळे तुमचा फोनही ‘आऊट ऑफ स्पेस’ होऊ शकतो.