बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लहान मुलांच्या लसीकरणात पडणार आणखी एका लसीची भर; ‘या’ वयोगटाला मिळणार डोस

नवी दिल्ली | कोरोनाचं संकट ओसरत असताना डेल्टा प्लस व्हेरिएंटनं थैमान घालाय़ला सुरुवात केली आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. नागरिक आता स्वतःहून पुढे येत लस घेत असल्याचं दिसत आहे. अशातच लहान मुलांच्या लसीकरणाबाबात एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

कोरोनाची तिसरी संभाव्य लाट रोखण्यासाठी लसीकरण गरजेचं आहे. यातच लहान मुुलांच्या लसीकरणासाठी आणखी एका लसीच्या परवानगीसाठी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता लहान मुलांच्या लसीकरणात आणखी एका लसीची भर पडणार असल्याचं पाहायला मिळत आहे.

लहान मुलांचं लसीकरण लवकरात लवकर व्हावं यासाठी अमेरिकन फार्मा कंपनी जॉन्सन अॅंडनं जॉन्सननं भारतातील 12-17 वयोगटातील मुलांसाठी कोरोना लसीच्या ट्रायलसाठी परवानगी मागितली आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच अमेरिकन फार्मा कंपनी जॉन्सन अॅंड जॉन्सनची सिंगल डोस असलेल्या कोरोना लसीला भारतात आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळाली.

दरम्यान, लहान मुलांच्या लसीसाठी केलेल्या मागणीला लवकर परवानगी मिळू शकते. त्यामुळे ही एक आनंदाची बातमी असून लहान मुलांच्या लसीकरणात मदत होईल. आता या लसीला परवानगी भेटते की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

संभाजीराजे अशोक चव्हाणांवर बरसले, म्हणतात ‘आम्ही पण 96 टक्केवाले मराठे’

मोठी बातमी! किरीट सोमय्यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून दगडफेक आणि शाईफेक

“पेट्रोल-डिझेल स्वस्त हवं असेल तर अफगाणिस्तानला जा”

…म्हणून मी दिवसभरात फक्त एकच वेळ जेवतो- नरेंद्र मोदी

“शुद्धीकरणसाठी ब्राह्मण लागतो, आम्हाला मागायचा ना आमच्याकडे खूप आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More