बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंदाची बातमी! अखेर पुण्यातील त्या चिमुरडीला 16 कोटीचं इंजेक्शन आज मिळालं

पुणे | पुण्यातील वेदिका शिंदे नावाची 11 महिन्याची चिमुरडी गेल्या काही दिवसांपासून ‘स्पायनल मस्क्युलर ऍस्ट्रॉफी’ या भयंकर आजाराशी झुंज देत आहे.  या आजारावरील उपचारासाठी वेदिकाला तब्बल 16 कोटी रुपयांचं ‘जीन रिप्लेसमेंटचे झोलजेन्स्मा’ हे इंजेक्शन देणं गरजेचं होतं. हे इंंजेक्शन आज वेदिकाला देण्यात आलं आहे.

वेदिकाला 16 कोटी रुपयांचं इंजेक्शन मिळवून देण्यासाठी वेदिकाचे वडील सौरभ शिंदे यांनी जिवाचे रान केले. क्राउड फंडिंगच्या माध्यमातून गेल्या तीन महिन्यांत त्यांनी पैसे जमा केले आणि आपल्या मुलीसाठी परदेशातून हे इंजेक्शन मागवलं. आज वेदिकाला पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात हे इंजेक्शन देण्यात आलं आहे. हे इंजेक्शन दोन दिवसांपूर्वीच रुग्णालयात आलं होतं.

लहान मुलांचे न्यूरॉलॉजिस्ट डॉ. संदीप पाटील वेदिकावर उपचार करत आहेत. डॉ. संदीप पाटील यांनीच हे औषध वेदिकाला दिले आहे. वेदिकाला हे औषध देण्यात आल्यानंतर आता वेदिकाच्या वडिलांनी सर्वांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, औषधांचा खर्च उभारण्यासाठी मला माझे नातेवाईक मित्र परिवार आणि त्यापेक्षा असे दानशूर व्यक्ती आहेत जे मला माहीतही नाहीत या सर्वांनी मदत केली आहे. या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे.

दरम्यान, स्पायनल मस्क्युलर ऍस्ट्रॉफी’ या भयंकर आजारामुळे व्यक्तीमध्ये प्रोटीन तयार करण्यासाठी जो जीन असणे अपेक्षित असते तो नसल्याचे आढळून येते. यामुळे सर्व गोष्टींवर बंधने येऊ लागतात आणि परिस्थिती गंभीर होत जाते. अमेरिकेत या आजरावरिल उपचारासाठी काही औषधे हल्लीच उपलब्ध झाली आहेत.

थोडक्यात बातम्या – 

“उद्या लोकप्रतिनिधींना बोलुद्यात, आपण सर्वांनी मौन राखायचे” – छत्रपती संभाजीराजे

आनंदाची बातमी! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे शहराने करून दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

ह्दयद्रावक! ‘या’ जिल्ह्यातील अवघ्या 6 महिन्याच्या चिमुकलीचा म्युकरमायकोसीसने मृत्यू

कोरोना लसीमुळे मृत्यू झालेल्या पहिल्या व्यक्तीची भारतात झाली नोंद!

पुढचे 5 दिवस राज्यात पावसाचे राज्य; ‘या’ भागात अतिवृष्टी तर मुंबईत मुसळधार पाऊस

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More