सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पगारात वाढ होण्याची शक्यता

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

मुबंई | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (Government employees) एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. सध्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) आर्थिक बजेट 2023 सादर करणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील कर्मचाऱ्यांना सरकराकडून काही अपेक्षा आहेत.

सरकारी कर्मचाऱ्यांनी केेंद्राकडं तीन मागण्या (Demands) केल्या आहेत. सरकारने या बजेटमध्ये या मागण्या मान्य केल्यास केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळं डीए, डीएचे थकबाकी पेमेंट आणि फिटमेंट फॅक्टकरमध्ये देखील वाढ करण्याची मागणी आहे.

कोरोना (Corona) काळात सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए 18 महिने थांबवण्यात आला होता. त्यामुळे थांबवण्यात आलेला डीएची थकबाकी लवकरात लवकर मिळावी, ही कर्मचाऱ्यांची पहिली मागणी आहे. जानेवारी 2020 पासून ते जून 2021 पर्यंतचा डीए पेंडिंग आहे.

फिटमेंट फॅक्टरमध्ये (Fitment factor) वाढ करण्याची मागणी देखील कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार 18,000 वरुन 26,000 होण्याची शक्यता आहे. फिटमेंट फॅक्टरमध्ये 2.57 टक्क्यांवरुन 3.68 टक्के वाढ करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

डीए मध्ये सरकार वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाढ केल्यास कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाच्या सुरुवातीला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. डीए अर्थात सरकारी कर्मचारी भत्ता हा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेचा एक भाग असतो. सरकार दर सहा महिन्यांनी डीए (DA) बदलत असते.

महत्त्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe