नवी दिल्ली | एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. एअर इंडियाचे पायलट, क्रू मेंबर्सचा आनंद द्विगुणीत करणारा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला आहे.
कोरोना महामारीच्या काळात पायलट व क्रू मेंबर्सच्या पगारात, उड्डाण आणि लेओव्हर भत्त्यात कपात करण्यात आली होती. ही कपात लवकरच परत केली जाणार आहे. एवढच नाही तर या कर्मचाऱ्यांच्या पगारातही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एअर इंडियाचे नवे मालक अर्थात टाटा समूहाने पगार आणि भत्त्याच्या पूनर्रचनेअंतर्गत त्यांच्या तीन विमान कंपन्यांच्या पायलट आणि क्रु मेंबर्सचे पगार पुनर्संचयित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
दरम्यान, टाटा समूहातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की कंपनी सध्या कर्मचाऱ्यांसाठी भत्ते, रजा धोरण आणि इतर उपाययोजनांवर विचार करत आहे. पगार आणि भत्ते पुनर्स्थापित करणे अद्याप लागू झाले नसल्याचं एअर इंडियाच्या दोन कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“गधे को दिया मान.. गधा पहुँचा आसमान”
“मुख्यमंत्री केलं तेव्हा नारायण राणे काय धुतल्या तांदळाचे होते का?”
मोठी बातमी! नारायण राणेंच्या बंगल्यावर मुंबई पालिकेचं पथक रवाना
मोठी बातमी! मोदी सरकारचा केंद्रीय कर्मचाऱ्यांना झटका
Zaira Wasim : “हिजाब ही चाॅईस नसून ही एक जबाबदारी आहे”
Comments are closed.