बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मद्यप्रेमींसाठी गुड न्यूज; उत्पादन शुल्क विभागाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | राज्यात कोरोना रूग्णांच्या संंख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात विकेंड लाकडाऊन लावला आहे. तसेच 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध घातले आहे. प्रत्येक शनिवारी आणि रविवारी कडक टाळेबंदी असणार आहे. मात्र असं असलं तरी मद्य प्रेमींना घरी मद्य मागवता येणार आहे.

उत्पादन शुल्क विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, बार आणि मद्य विक्री करणाऱ्या दुकानांना घरपोच सेवा देण्यास परवानगी दिली आहे. ग्राहकांना हॉटेल आणि बार मध्ये जाऊन पदार्थ घेण्यास मनाई आहे. मात्र त्यांना आता घरी मद्य मागवता येणार आहेत.

मागच्या वर्षी अचानक केलेल्या लॉकडाऊनमुळे मद्य दुकाने मद्यप्रेमींना बंद झाली होती. तब्बल दीड एक महिना सर्व दुकाने बंद होती. त्याचा मद्यप्रेमींना झटका आणि सरकारला चांगलाच फटका बसला होता. मात्र यावेळी लॉकडाऊन करताना राज्य सरकारने ऑनलाईन मद्य विक्रीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

बार आणि वाईन्स शॉपला घरपोच सेवा देता येणार आहे. मात्र त्यासाठीची यंत्रणा त्यांना स्वतःलाच उभारावी लागेल. शिवाय त्यासाठी केवळ त्यांच्याच कामगारांची नेमणूक करावी लागेल. ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपन्यांचा उपयोग त्यांना करता येणार नसल्याचं कळतंय.

थोडक्यात बातम्या- 

‘लोक पोलिसांना चोपून काढतील अन् मारामारी झाली तर…’; उदयनराजे भोसले आक्रमक

कार चालकाने अचानक दरवाजा उघडला, दुचाकीस्वार रस्त्यावर आडवा, भरधाव बसने चिरडलं

…अन् खासदार छत्रपती उदयनराजे भोसले कटोरा घेऊन बसले रस्त्यावर

धक्कादायक! जिवंत रुग्णाचा दिला मृत्यू दाखला; निष्काळजीपणाचा कळस

“देशातील 50 टक्के रुग्ण महाराष्ट्रात, पाकिस्तानला लस देण्यापेक्षा महाराष्ट्राला द्या”

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More