बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आशा सेविकांसाठी आनंदाची बातमी! मानधनात वाढ आणि कोविड भत्ताही मिळणार, राज्य सरकारचा निर्णय

मुंबई | कोरोनाकाळात डॉक्टर, नर्स, पोलिसांप्रमाणे आशा सेविकांनीही मोलाची भूमिका निभवली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून मानधनात वाढ करण्याची मागणी करत ‘आशा’ आरोग्य सेविकांनी आंदोलन केलं होतं. सरकारकडून आशा सेविकांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांच्या मानधनात वाढ केली आहे. त्यासोबत त्यांना कोरोनाभत्ताही देण्यात येणार आहे.

आशा सेविकांच्या आंदोलनाला सरकारने गांभीर्याने घेतलं नसल्याने त्या संपावर गेल्या होत्या. मात्र सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. आशा सेविकांना 1 हजार रुपये मानधनवाढीसोबतच 500 रुपये कोविड भत्ता देखील देण्याचं राज्य सरकारनं मान्य केलं आहे. येत्या 1 जुलैपासून ही नवी मानधनवाढ आणि कोविड भत्ता लागू होणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत झालेल्या आशा कृती समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असून या तोडग्यानंतर संप मागे घेत असल्याचं समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केलं आहे. आपल्या मागण्यांसाठी राज्यातील जवळपास 70 हजार आशा व गटप्रवर्तकांनी 15 जूनपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला होता.

दरम्यान, ‘आशां’ना विशेष भेट म्हणून स्मार्ट फोन देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. बैठकीत झालेल्या चर्चेअंती आशा आणि गटप्रवर्तकांचा संप मागे घेत असल्याची घोषणा कृती समितीचे अध्यक्ष एम.के. पाटील यांनी यावेळी केली.

 

थोडक्यात बातम्या- 

कोरोनायोद्धा म्हणण्यापेक्षा आमच्या मागण्या मान्य करा म्हणत परिचारिकांचं आंदोलन!

“सामान्य माणसाचे डोळे उंदीर कुरतडतोय, तर शिवसेनेनं मुंबई महापालिकेलाच कुरतडलं”

“केंद्रातील मोदी सरकार घालवल्याशिवाय देशातील शेतकऱ्यांसह, कष्टकऱ्यांचे अच्छे दिन येणार नाही”

कंगना रणौतनं केली देशाचं नाव बदलण्याची मागणी, म्हणाली….

“2024 मध्ये जनता मोदी सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More