बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Altroz CNG च्या प्रतिक्षेत असलेल्या कार चाहत्यांसाठी खुशखबर, कार होतेय लाँच, जाणून घ्या किंमत!

मुंबई | देशात इंधनाचे दर मागील काही वर्षापासून गगणाला भिडले आहेत. त्यामुळे याचा फटका इंधनावर चालणाऱ्या गाड्यांना बसला आहे. अशातच आता देशातील प्रमुख कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने आपल्या कंपनीमधील Altroz या कार कंपनीमध्ये बदल करण्याचं ठरवलं आहे.

टाटा मोटर्सने आता सेगमेंटमध्ये अग्रेसर होण्याचं ठरवलं आहे. कंपनीच्या हॅचबॅक टियागो आणि कॉम्पॅक्ट सेडान टिगॉरच्या सीएनजी वाहनांच्या व्हेरिएंटची चर्चा सुरू आहे. त्यामुळे टाटा कंपनीने अलिकडेच एक कारचा उत्सर्जन चाचणी किटसह एक फोटो आता समोर आला आहे. तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Altroz ​​चे CNG व्हेरिएंट आले तर यामध्ये 1.2 लीटर थ्री-सिलिंडर नॅचुरली एस्पिरेटेड इंजिन दिसेल. जे 86 अश्वशक्तीची उर्जा (हॉर्स पावर) आणि 113 न्यूटन मीटर पीक टॉर्क निर्माण करते. साहजिकच CNG मध्ये, कारचे पॉवर आउटपुट कमी होईल. अशा परिस्थितीत, Altroz ​​CNG मध्ये 10-14 हॉर्स पावर कमी उर्जा उत्पादन करू होईल.

दरम्यान, कंपनीने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. या कराची किंमत 5.69 लाख ते 9.45 लाख रूपयांदरम्यान असणार आहे. त्याचबरोबर या कार मध्ये 7 व्हेरिएंट आणि तीन इंजिन ऑप्शन्समध्ये देत आहे.

थोडक्यात बातम्या-

राष्ट्रवादीच्या ‘या’ चार दिग्गज नेत्यांचे जावई किरीट सोमय्यांच्या निशाण्यावर

जावेद अख्तर यांनी शिवसेनेच्या दबावाखाली…; कंगनाचा शिवसेनेवर गंभीर आरोप

“कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी एनडीएमध्ये यावं, मोदी सर्वांचा सन्मान करतात”

रश्मी ठाकरेंच्या संपत्तीबाबत सोमय्यांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांचा पलटवार!

“केवळ मोदी लाटेच्या जीवावर निवडणुका जिंकू शकत नाही कारण…”; माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More