नवी दिल्ली | केंद्रीय (Goverment) कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी केंद्र सरकारने दिली आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार असल्याचं सांगितलं जात होतं. वर्षातून दोन वेळा कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाते.
जगात आर्थिक मंदी येण्याची चाहूल तज्ज्ञांनी दिली आहे. महागाई आणखीन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सप्टेंबर (September) महिन्यात महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्यात आली होती. आता देखील येत्या नवीन वर्षात 4 टक्के महागाई भत्ता (DA) वाढण्याची शक्यता आहे.
अशातच अजून एक खुशखबर आली आहे. कोरोनाच्या काळात पेन्शनधारकांचा 18 महिने महागाई भत्ता आणि DR देण्यात आला नव्हता. ती देण्याची मागणी अनेक दिवस केंद्रीय कर्मचारी (Central Staff) करत आहेत. तसेच फिटमेंट फक्टॅर वाढवण्याची दुसरी मागणी कर्मचाऱ्यांची होती. त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार सरकार या गोष्टीवर विचार करत असून लवकरच यासंबधी निर्णय घेणार आहे.
सरकारने पुढच्या वर्षाची वाट न पाहता याचवर्षी अर्थात याच महिन्यात याचा निर्णय द्यावा अशी अपेक्षा आहे. असे झाल्यास आणि सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठा बदल झाल्याचं दिसून येणार आहे. या मिळणाऱ्या पगारात फिटमेंट फक्टॅरचा (Fitment factor) महत्वाचा भाग आहे.
जी थकबाकी कोरोना (Corona) काळात 18 महिने सरकारकडून करण्यात आली होती. त्याचं कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनश्रेणीनुसार डीएची थकबाकी सरकारकडून मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. फिटमेंट फक्टॅर मुळेच पगारातही वाढ होते. त्यामुळे याचा फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे.
2016 पासून 2.57 पटीने फिटमेंट फक्टॅर दिला जातो. त्यामध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे. 3.68 पट इतका फिटमेंट फक्टॅर वाढवण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे. सरकारने या मागणीचा विचार केल्यास कर्मचाऱ्यांची दिवाळी साजरी होऊ शकते. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगार 6000 पासून अचानक 18000 होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या