बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर; भारतातील ‘या’ मैदानावर होऊ शकतो T20 World Cupचा पहिला सामना

धर्मशाळा | ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा टी-20 विश्वचषकची सुरुवात धर्मशाळा क्रिकेट स्टेडियमपासून सुरू केली जाऊ शकते. यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा होणार असल्याचे अरुण धुमाळ यांनी सांगितले. सर्व सामने फक्त भारतातच होतील. अशा परिस्थितीत आम्ही विश्वचषक उद्घाटन सामना हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन धर्मशाळा स्टेडियमवर व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहोत, असं बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी म्हटले आहे.

धर्मशाळा स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आयोजित केल्यामुळे पर्यटन शहर धर्मशाळेला पुन्हा एकदा जागतिक स्तरावर मान्यता मिळेल. स्थानिक व्यावसायिकांनाही यातून मोठा फायदा होईल अशी अपेक्षा आहे. धर्मशाळा क्रिकेट स्टेडियमवर बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय सामन्यांचा दुष्काळ आहे. धर्मशाळेत मोठ्या संख्येने पर्यटक येत असले तरी सामन्यांचे आयोजन करून पर्यटनाला चालना मिळेल, असंही त्यांनी सांगितलं.

2016 मध्ये धर्मशाळेत भारत-पाकिस्तान टी-20 विश्वचषक राजकीय कारणास्तव रद्द करण्यात आला होता. यानंतर धर्मशाळा स्टेडियमला ​​यजमानपदाची संधी मिळाली. 2019 आणि 2020 मध्येही भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामने पावसामुळे रद्द झाले होते.

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना 27 जानेवारी 2013 रोजी धर्मशाला स्टेडियमवर खेळला गेला. त्यानंतर 20 ऑक्टोबर 2015 रोजी भारत-दक्षिण आफ्रिका आणि 18 मार्च 2016 रोजी न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया दरम्यान टी-20 विश्वचषक सामना खेळला गेला.

थोडक्यात बातम्या – 

आयपीएल सुरु होण्याआधीच विराट कोहलीला मोठा धक्का, ‘ही’ भविष्यवाणी खरी ठरली तर…

काल जुळ्या मुलांना दिला जन्म, आज कोरोनामुळे आईचा मृत्यू

आयपीएल सुरु होण्याआधीच धोनी फुल्ल फॅार्ममध्ये; CSKनं शेअर केला ‘हा’ व्हिडीओ

चुकून गोळी लागून झाला मित्राचा मृत्यू, अपराधी भावनेतून तीन जणांची आत्महत्त्या

फखर जमान रनआऊट प्रकरण, ‘या’ कारणामुळे क्विंटन डी कॅाकला क्लीनचीट!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More