बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तरच प्रेक्षकांना आयपीएल पाहण्यासाठी स्टेडिअममध्ये प्रवेश मिळणार”

मुंबई | येत्या 19 सप्टेंबरपासून आयपीएल स्पर्धेचं दुसरं पर्व सुरु होणार आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता नियमांचे पालन करुन आणि युएई सरकारने आखून दिलेल्या नियमांनुसार या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे सध्या आयपीएल प्रेमींचा आनंद गगनात मावेनासा झाला असून सगळ्यांचं लक्ष आपीएलकडे लागलं आहे.

गतवर्षी कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना आवाज स्टेडियममध्ये ऐकू येणार आहे. कोरोना लस घेतली असेल तरच प्रेक्षकांना स्टेडिअममध्ये प्रवेश मिळणार असून स्टेडियममध्ये मर्यादित प्रेक्षकांना प्रवेश दिला जाईल, असं बीसीसीआयनं म्हटलं आहे.

आयपीएल 2021चे यंदाचे सामने दुबई, शारजा आणि आबु धाबीमधील मैदानांवर आयपीएलचे उर्वरित सामने खेळवले जाणार आहे. 16 सप्टेंबरपासून अधिकृत वेबसाइटवरुन क्रिकेट चाहते सामन्यांची तिकीट खरेदी करु शकतात, असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान,  www.iplt20.com. या बेवसाइटशिवाय PlatinumList.net. या बेवसाईटवरुनही सामन्याची तिकीट बुक करता येणार आहेत. स्टेडियमच्या क्षमतेच्या 50 टक्के प्रेक्षकांना मैदानात प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींसाठी ही खूप आनंदाची बातमी असून सगळ्यांना आयपीएलचे वेध लागले आहेत.

थोडक्यात बातम्या –  

टाइम्स मॅगझिनच्या सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये दहशतवादी मुल्ला बरादरचा समावेश!

गरिबांचा मसीहा सोनू सूदच्या घरी आयकर विभागाचा छापा, तब्बल 20 तास केली झाडाझडती

‘देव तारी त्याला कोण मारी’; बसच्या चाकाखाली येऊनही दुचाकीस्वार वाचला, पाहा व्हिडीओ

चीनमध्ये डेल्टाचा धुमाकूळ; देशात पुन्हा दहशतीचं वातावरण

मोठी बातमी! एअर इंडियाला खरेदी करण्यासाठी ‘या’ कंपनीने लावली बोली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More