बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेर प्रतिक्षा संपली! ‘या’ तारखेपासून सुरु होणार नाट्यगृहे

मुंबई | कोरोनाच्या महामारीनं जगभरात थैमान घातलं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता केली गेली. याच पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा आणि इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात आली. मात्र सिनेमागृह, नाट्यगृह सुरु करण्यास परवानगी अद्यापही मिळाली नव्हती. अशातच आता पुन्हा एकदा नाट्यगृहांमध्ये तिसरी घंटा ऐकू येणार असल्याची आनंदाची बातमी समोर येत आहे.

कोरोना काळात नाट्यगृहे बंद असल्यानं रंगभूमी कलाकारांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. फक्त रंगभूमीवर पोट भरणाऱ्या कलाकारांची तर उपजिविका करणंही अवघड होऊन गेलं. त्यामुळे कलाप्रेमी, रंगभूमीवरचे कलाकार सतत ठाकरे सरकारला नाट्यगृहे खुली करण्यासाठी आवाहन करत होते. अखेर नाट्यप्रेमींसाठी आनंदी बातमी असून नाट्यगृहे 5 नोव्हेंबरपासून 50 टक्के क्षमतेनं सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

अखिल भारतीय नाट्य परिषदच्या सदस्यांनी काल 3 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नाट्यगृह सुरू करण्यासाठी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील नाट्यगृहे 5 नोव्हेंबरपासून 50 टक्के क्षमतेनं सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

दरम्यान, नाट्यगृह सुरु करण्यासाठी अनेक कलाकारांनी, अखिल भारतीय नाट्य परिषदेनं ठाकरे सरकारकडं अनेक विनंत्या केलेल्या पहायला मिळाल्या. कोरोनाचे सर्व नियम आणि अटी पाळून नाट्यगृहात कार्यक्रम सादर केले जातील, अशी ग्वाहीही यावेळी देण्यात आली.

थोडक्यात बातम्या – 

ओबीसी आरक्षणाचा विषय निकाली लागणार?; ‘या’ मुद्द्याला राज्यातील सर्व पक्षांचा पाठिंबा

दिलासादायक! मुंबईतील कोरोना आटोक्यात; सक्रिय रूग्णसंख्येत लक्षणीय घट

राज्याच्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार, जाणून घ्या आजची आकडेवारी!

पुणे कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

स्मशानभूमीकडे जाताना सिद्धार्थ…सिद्धार्थ म्हणत शेहनाजचा आक्रोश, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More