बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिवाळीपूर्वी खवय्यांसाठी खूशखबर! ‘या’ गोष्टींच्या किंमतीत मोठी घट

मुंबई | दिवाळी जवळ आली तस बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. दिवाळी म्हटलं की विविध प्रकारचे पदार्थ आणि खवय्यांची चंगळ पहायला मिळते. यावर्षी दिवाळी महागाईमध्ये जाण्याची भीती नागरिक व्यक्त करत असतानाच सर्वांसाठी एक आंनदाची बातमी आली आहे. सुकामेवा हा सर्वांचा आवडता पदार्थ असतो. अशातच बदाम, काजू, अक्रोड यांच्या किंमतीत घट झाल्याचं पहायला मिळत आहे.

दिवाळीपूर्वी बदामाच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पहायला मिळालं आहे. बदामाचे दर प्रतिकिलो 1100 वरून 600 रूपयांवर आले आहेत. तर काजूच्या दरात सुद्धा मोठी घसरणा पाहायला मिळत आहे. देशातील सर्वात मोठी सुका मेवा बाजारपेठ असणाऱ्या खारी बाओली येथील व्यापारी यांनी दरांच्या घसरणीबाबत आपली मतं मांडली. अफगाणिस्तानमधील परिस्थितीमुळं भारतातील सुका मोव्याच्या किंमतीत वाढ झाली होती पण सध्या वेगानं हे दर कमी होतं आहेत. येणाऱ्या काळात नव्या उत्पादनानं बाजारात आणखीनं दबाव निर्माण होईल, असं व्यापारी रवि बत्रा म्हणाले आहेत.

बदामाचे दर विक्रमी घसरत आहेत. 1100 रूपये प्रतिकिलो असणारे बदाम आज 600 रूपये प्रतिकिलो झाले आहेत. काजूचे दर 1000 रूपयांवरून घसरून 800 रूपये प्रतिकिलोवर आले आहेत. तर अक्रोडसुद्धा 1000 रूपये प्रतिकिलोवरून 800 रूपये प्रतिकिलोवर आले आहेत. परिणामी या दिवाळीत खवय्यांची चंगळ पहायला मिळणार आहे. दिवाळीपूर्वी दरामध्ये आणखीन मोठी घसरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भारतात तीन ठिकाणांवरून सर्वाधिक बदाम आयात केले जातात. अफगाणिस्तान, ईराण, कॅलिफोर्नीया या तीन ठिकाणावरून उच्च प्रतीचे बदाम आयात करण्यात येतात. गुणवंत गिरी, मामरा गिरी आणि अजून काही प्रकारचे बदाम भारतीय बाजारात उपलब्ध आहेत.

थोडक्यात बातम्या 

“ज्यांनी तुमच्या हातात दगड दिले त्यांनी तुमचं काय भलं केलं?”

यंदाच्या दिवाळीतही चीनी दिव्यांचाच लखलखाट; चीनी मालाची कोट्यवधींमध्ये उलाढाल

‘समीर वानखेडे 2 लोकांचे फोन टॅप करत आहे’, नवाब मलिकांच्या आरोपाने खळबळ

‘त्या’ लेटर बाॅम्बवर क्रांती रेडकरचं पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर, म्हणाली…

स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ शेअर करत भाजप नेत्याने केली समीर वानखेडेंची पाठराखण, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More