इंजिनीयरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; उदय सामंत यांनी केली मोठी घोषणा
मुंबई | यंदा कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. शिक्षणाचा तर खेळ खंडोबा झाल्याचं चित्र आहे. ग्रामीण भागातून शहरात इंजिनीयरिंगसाठी आलेले विद्यार्थी पुन्हा आपल्या गावी परतले होते. शिक्षण जरी ऑनलाईन पद्धतीनं शिकवलं जात असलं तरी, या विद्यार्थ्यांना अनावश्यक फी भरावी लागत होती. अशात आता उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक घोषणा केली आहे.
कोरोना परिस्थितीचा विचार करून आगामी शैक्षणिक वर्षात म्हणजेच 2021-22 या शैक्षणिक वर्षात शासकीय इंजिनीयरिंग महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना फी व्यतिरिक्त असलेल्या इतर शुल्कामध्ये 16 हजार 250 म्हणजेच अंदाजे 25 टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ही घोषणा केली आहे.
शासकीय व शासन अनुदानित स्वायत्त अभियांत्रिकी संस्थेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणी शुल्काशिवाय इतर शुल्कही भरावे लागते. त्यात ग्रंथालय, जिमखाना व अन्य सुविधांचा समावेश आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांनी या सुविधांचा वापर केला नसल्याने त्यांना इतर शुल्कामध्ये सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला, असं सामंत यांनी सांगितलं आहेे.
दरम्यान, व्हीजेटीआयमधील मुलींच्या वसतिगृहाचे ‘मातोश्री’ नामकरण , या संस्थांना शिक्षक व शिक्षकेतर पदे पंत्राटी तत्त्वावर स्वतःच्या निधीतून भरण्यास मान्यता देणे, संस्थांच्या 2020-21 च्या अर्थसंकल्पास मान्यता देणे, बांधकामाचे प्रस्ताव असल्यास सादर करण्याच्या सूचना उदय सामंत यांनी दिल्या आहेत.
थोडक्यात बातम्या-
“पुण्यातले गरीब झोपडीधारक सेलिब्रिटी नाहीत म्हणून भाजपवाले गप्प आहेत का?”
“नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली”
विनायक मेटेंना शिवीगाळ करत, मराठा आरक्षण बैठकीत शिवसैनिकांचा राडा!
मराठा समाजाला 3 हजार कोटींचं, तर बारा बलुतेदारांना 7 हजार कोटींचं पॅकेज द्या- भाजप
“विजय वडेट्टीवार यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हकालपट्टी करावी”
Comments are closed.